Join us  

हॉबी क्लबच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2016 12:15 AM

हॉबी क्लबच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

हॉबी क्लबच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
जळगाव-जिल्हा हॉबी क्लबची सभा कमल जैन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. न्यूमीसमॅटीक म्हणजे नवीन-जुन्या नाण्यांचा अभ्यास या सदरात ॲड.राजन अट्रावलकर यांनी अकबर कालिन नाण्यांच्या चलन पद्धतीबाबत माहिती दिली. प्रा.प्रकाश महाजन यांनी सातव्या शतकातील पल्लवांच्या काळातील विष्णुकुंडी राजाच्या काळातील दुर्मिळ नाणी सादर करीत माहिती दिली. कौशिक शाह यांनी जुन्या काळातील शेअर्स प्रदर्शित केले. मसूद मशरुद्दीन शेख यांना वास्तूशास्त्रात पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश पांडे, रमेश बारी, संदीप मंडोरे, संतोष पात्रा, देवेंद्र वारडे, भगतसिंह वेद, मयंक वेद, सिताराम अग्रवाल, हर्षल पांडे उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अर्थमंत्र्यांना निवेदन
जळगाव-महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे अर्थमंत्री व रेल्वेमंत्री यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. वरिष्ठ पेन्शन योजनेसाठी सर्व्हिस टॅक्स माफ करावा. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेखाली शेकडा १० टक्के व्याज द्यावे, ज्येष्ठ नागरिकांच्या बँकेतील ठेवींवर दोन टक्के जादा व्याज द्यावे. ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखांपर्यंत आणि ८० वर्षावरील ज्येष्ठांना सात लाखापर्यंत प्राप्तीकर सवलत द्यावी यासह विविध मागण्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. २७ रोजी फैजपूर येथील कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे यांना फेस्कॉमचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी निवेदन दिले.

सुजाता गायकवाड राज्यात दुसरी
जळगाव- दीपस्तंभ फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती अभिनयानातील विद्यार्थीनी सुजाता गायकवाड ही ओबीसी महिला संवर्गातून महाराष्ट्रातून दुसर्‍या क्रमांकावर यशस्वी झाली. सुजाता यांची मंत्रालय सहाय्यकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुजाता यांनी यापूर्वी विक्रीकर निरीक्षक (पूर्व), राज्यसेवा (पूर्व), मंत्रालय सहाय्यक (पूर्व) या परीक्षांमध्ये पात्र ठरली आहे. तिने पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. या निवडीबद्दील दीपस्तंभचे कार्यकारी संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी अभिनंदन केले आहे.