Join us  

घाणेकर नाट्यगृहात उपाहारगृह नसल्याने प्रेक्षकांची गैरसोय

By admin | Published: August 21, 2014 9:45 PM

घोडबंदर : ठाणे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या व भाडेकरारावर दिलेल्या उपाहारगृहाचे भाडे वेळेत वसूल होत नसल्याचे पाहून नवीन उपाहारगृह भाड्याने देण्याचे धारिष्ट्य प्रशासन दाखवत नसल्याचे उघडकीस येत आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या उपाहारगृहाचा ठेका काढला जात नसल्यामुळे नाट्यगृहात येणार्‍या प्रेक्षकांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

हे नाट्यगृह सुरू झाल्यापासून उपाहारगृहासाठी असलेली पावणेसात हजार स्क्वेअर फुटांची जागा पडून आहे. नाटकासाठी व इतर कार्यक्रमांसाठी येणार्‍या प्रेक्षकांचा उपाहारगृह नसल्यामुळे पुरता हिरमोड होताना दिसत आहे. मध्यंतराला काही प्रेक्षक रस्ता ओलांडून टपर्‍यांवर जाऊन चहा, नाश्ता करताना दिसतात. कार्यक्रमाला येणार्‍या लहान मुलांची फारच गैरसोय होत आहे.
प्रशासनाने उपाहारगृहाचा ठेका दोनदा काढला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, ठेकेदार निश्चित का होत नाही, याबाबत प्रशासन खुलासा देऊ शकले नाही. सध्या मिफ्ताकडून १७ ते २५ ऑगस्टदरम्यान नाट्य व चित्रपट सोहळा संपन्न होत असून या कार्यक्रमांसाठी असंख्य ठाणेकर रोज येथे हजेरी लावतात. या सर्व प्रेक्षकांचीही उपाहारगृह नसल्यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.
(वार्ताहर / नामदेव पाषाणकर)