Join us  

प्रत्यक्ष कर वसुली १८ टक्क्यांनी वाढली - जेटली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:01 AM

३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली १८ टक्क्यांनी वाढून १0.0२ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली म्हणाले की, नोटांबदी आणि जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात औपचारिक झाली आहे.

नवी दिल्ली -  ३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षात प्रत्यक्ष करांची वसुली १८ टक्क्यांनी वाढून १0.0२ लाख कोटी रुपयांवर गेल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जेटली म्हणाले की, नोटांबदी आणि जीएसटी यांच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात औपचारिक झाली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्रांची संख्या एक कोटीने वाढली आहे.जेटली यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले की, वित्त वर्ष २0१७-१८ मध्ये प्रत्यक्ष कर वसुली १0,0२,६0७ कोटी रुपये (आदल्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्के अधिक) झाली. यातून कर विभागाची कार्यक्षमता आणि प्रामाणिक करदात्यांच्या संख्येतील वाढ दिसून येते. जबाबदार मोदी सरकारच्या कामगिरीची वास्तविक ग्वाही मिळते.

टॅग्स :अरूण जेटलीकर