Join us  

अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2016 3:33 AM

अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना असाव्यात अशी मागणी असोचेमने अर्थमंत्रालयाला केलेल्या शिफारशीत केली आहे.

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना असाव्यात अशी मागणी असोचेमने अर्थमंत्रालयाला केलेल्या शिफारशीत केली आहे. मुलांच्या शिक्षण भत्त्यात १० टक्के वाढ करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे. असोचेमने केलेल्या मागण्यांत प्रामुख्याने पाळणाघरासाठी करात सूट असावी ही मागणी आहे, तर दोन मुलांपर्यंत २५०० रुपये प्रति मासिक शिशू भत्ता देण्यात यावा, अशी शिफारस आहे. असोचेमचे अध्यक्ष सुनील कनोरिया यांनी सांगितले की, आम्हाला विश्वास आहे की, अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष प्रस्ताव येऊ शकतात. जेणेकरून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. उद्योग मंडळाने सल्ला दिला आहे की, मुलांच्या शिक्षा भत्त्यात मासिक सूट सीमा १००० रुपये करावी. जी सध्या १०० रुपये आहे. होस्टेल खर्च भत्ता सूट सीमा सध्या ३०० रुपये आहे ती ३००० रुपये करावी, असेही यात म्हटले आहे. मुलांच्या शिक्षणासाठीचा भत्ता सध्याच्या शुल्काच्या तुलनेत अतिशय कमी आहे. १९८८-८९ मध्ये हा भत्ता ठरविण्यात आला होता, असेही यात म्हटले आहे. इतरही काही महत्त्वाच्या तरतुदी सुचविण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)