Join us

कर्ज स्वस्त होण्यास विलंब होणार...!

By admin | Updated: April 6, 2016 23:01 IST

रिझर्व्ह बँकेने मंगळवारी नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात 0.२५ टक्का कपात केली असली तरी बँका त्याचा फायदा आपल्या ग्राहकांना तातडीने देणार नसल्याचे संकेत आहेत.

मुंबई : रिझर्व्ह बँकेने मंगळवारी नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात 0.२५ टक्का कपात केली असली तरी बँका त्याचा फायदा आपल्या ग्राहकांना तातडीने देणार नसल्याचे संकेत आहेत.बँकांच्या या भूमिकेतील एक निश्चित कारण आहे. बँकांनी अलीकडेच व्याजदर निश्चित करण्यासाठी ‘मार्जिन कॉस्ट आॅफ फंडस्’ (एमसीएलआर) फॉर्म्युला अवलंबिला आहे. त्या आधारे अनेक बँकांनी एक एप्रिलपासून आपल्या व्याजदरात कपात केलीआहे. त्यामुळेच इतक्यात तरी रेपो दरातील कपातीचा ग्राहकांना फायदा देण्यास बँका तयार नाहीत.कर्जाचे व्याजदर घटविण्यापूर्वी बँकांना प्रथम ठेवींवरील व्याजदर घटवावे लागतील. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, यापुढे कर्ज स्वस्त होतच राहील. बाजाराची स्थिती पाहता बँका कर्जावर अगोदरच कमी व्याजदर आकारत आहेत. जोपर्यंत ठेवीवरील दरात मोठी घसरण होत नाही, तोपर्यंत बँकांना कर्जावरील व्याजदर कमी करणे शक्य नाही.एमसीएलआरच्या नवीन प्रणालीमुळे व्याजदरात 0.२५ टक्के कपात झाली आहे. ही एक मोठी घडामोड आहे. कारण प्रत्यक्षातील व्याजदर कपातीपूर्वीच ग्राहकांसाठी कर्ज 0.२५ ते 0.५0 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. पतधोरणातील 0.२५ टक्के व्याजदर कपात फार महत्त्वपूर्ण आहे. आता कर्ज घेणे पूर्वीपेक्षा स्वस्त होईल आणि यापुढेही हाच कल कायम राहील, असे मंगळवारीच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट केले होते.आता स्टेट बँक आॅफ इंडिया एमसीएलआर सिस्टिमनुसार ९.४0 टक्के दरावर गृहकर्ज देत आहे. यापूर्वी बेस रेटच्या सिस्टिमनुसार ९.५0 दराने बँक कर्ज देत होती.कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ राकेश शर्मा म्हणाले की, पुढील तीन महिन्यांत कर्जाचे व्याजदर आणि ठेवींवरील व्याजदर या दोन्हींत घट होण्याची अपेक्षा आहे. एमसीएलआर प्रणालीतहत व्याजदर कपातीचा ग्राहकांना लवकर फायदा मिळेल. अर्थात याचा फायदा केवळ नवीन ग्राहकांना होईल. बेस रेटच्या प्रणालीत सर्वच ग्राहकांना कर्ज स्वस्त करावे लागत होते.बेस रेटच्या प्रणालीत ग्राहकांना पतधोरणातील व्याजदर कपातीचा फायदा मिळत नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे मत होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेच एमसीएलआर ही नवीन प्रणाली आणली.