Join us

ग्राहकमंचाचा बिल्डरला जबर दणका

By admin | Updated: May 29, 2014 03:47 IST

बिल्डरच्या मनमानी कारभाराला आणि त्याच्याकडून होणार्‍या संभाव्य फसवणुकीला आळा बसला आहे.

पुणे : महिलेच्या मालकीची जागा विकसनासाठी दिल्यानंतर त्या बदल्यात अन्य ठिकाणी जागा किंवा वीस महिन्यात संबंधित जागेवरील बांधकाम या दोन्हीही कराराचे उल्लंघन केल्याबद्दल ग्राहक न्यायमंचाने बिल्डरला नुकसान भरपाई आणि संबंधित जागा परत करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे बिल्डरच्या मनमानी कारभाराला आणि त्याच्याकडून होणार्‍या संभाव्य फसवणुकीला आळा बसला आहे. नसीमा इनामदार (रा. नवी सांगवी) यांची नानापेठ येथे ७०० चौरस फूट जागा आणि जुना वाडा आहे. त्यांनी ही जागा आणि त्यावर बांधकाम करण्यासाठी मोहंमद रियाज शेख उस्मान (रा. वानवडी) यांना विकसनासाठी करार करून दिली होती. या जागेच्या बदल्यात इनामदार यांना तेवढीच जागा आणि फ्लॅट बांधून देण्याचे बिल्डरने मान्य केले होते. हा करार २३ जुलै २०१० रोजी करण्यात आला होता. त्यामुळे इनामदार यांनी अ‍ॅड. श्रीनिवास माळी यांच्यामार्फत जिल्हा तक्र ार निवारण न्यायमंचाकडे तक्र ार केली. त्यावर मुख्य न्यायाधीश व्ही. पी. उत्पात, गीता घाटगे यांनी निर्णय दिला. यामध्ये बिल्डरने ७०० चौरस फुटांच्या फ्लॅटचा ताबा निकाल झाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत द्यावा, फ्लॅटचा ताबा देत नाही तोपर्यंत दरमहा पाच हजार रुपये द्यावेत आणि नुकसानभरपाई म्हणून २५ हजार रुपये, तक्र ारीच्या खर्चापोटी तीन हजार रुपये द्यावेत, असे आदेशात म्हटले आहे. बांधकाम व्यावसायिकाला जागा ताब्यात दिली नाही. त्यानंतर इनामदार यांनी त्यांना नोटीस पाठविली. त्यावर बिल्डरकडून बांधकाम सुरू आहे, महापालिकेने काही कागदपत्रे न दिल्याने काम खोळंबले आहे, इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर ताबा दिला जाईल, असे सांगून बिल्डरने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायमंचाच्या निकालामुळे बिल्डरला दणका बसला. (प्रतिनिधी)