सिंगापूर : चीनमधील वस्तू उत्पादन क्षेत्रात मंदी असल्यामुळे आशियाच्या बाजारपेठेत तेलाच्या किमती सोमवारी आणखी खाली आल्या. चीन हा जगात तेलाचा मोठा ग्राहक आहे. डॉलरची मजबूत किंमत आणि अमेरिकेच्या तेलाचे बाजारपेठेतील आगमन यामुळे आणि जागतिक पातळीवर आधीच कच्च्या तेलाचा अतिरिक्त पुरवठा असल्यामुळे तेलाच्या किमती खाली आल्या, असे बाजार विश्लेषकांनी म्हटले.वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठीचे तेल बॅरलमागे १६ सेंटस्ने स्वस्त होऊन ४७.९८ अमेरिकन डॉलरवर तर ब्रेंटचे कच्चे तेल सप्टेंबरच्या डिलिव्हरीसाठी ९ सेंटस्ने खाली येऊन ५४.५३ अमेरिकन डॉलरवर आले.स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चीनमधील उत्पादन गेल्या १५ महिन्यांतील सगळ््यात कमी नोंदले गेले. त्यामुळे जगातील या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला मरगळ आली आहे.
चीनमधील मंदीमुळे कच्चे खनिज तेल पुन्हा उतरले
By admin | Updated: July 28, 2015 04:01 IST