Join us

वाणिज्य: विजय कौसल व विलास वखरे यांची अविरोध निवड

By admin | Updated: August 23, 2014 22:04 IST

अकोला: अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाची कार्यकारिणी सर्वानुमते अविरोध निवडण्यात आली. अध्यक्षपदी विजय कौसल, तर सचिवपदी ॲड़ विलास वखरे यांची निवड करण्यात आली.

अकोला: अकोला जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाची कार्यकारिणी सर्वानुमते अविरोध निवडण्यात आली. अध्यक्षपदी विजय कौसल, तर सचिवपदी ॲड़ विलास वखरे यांची निवड करण्यात आली.
मंडळाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब जानोळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी काकासाहेब जोशी, रमेश ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष विजय कौसल, उपाध्यक्ष शशीधर खोटरे, उपाध्यक्ष विजय गहिलोत, सचिव ॲड़ विलास वखरे, सहसचिव संतोष मानकर, डॉ. ओमप्रकाश तळोकार, कोषाध्यक्ष राजेंद्र शाह, शहर प्रतिनिधी सचिन जोशी, ग्रामीण प्रतिनिधी राजेश भारती, बाळापूर प्रतिनिधी रमेश ठाकरे, आकोट प्रतिनिधी पंजाब सिरसाट, तेल्हारा प्रतिनिधी सुरेश खोटरे, पातूर प्रतिनिधी सुभाष जैन, बार्शीटाकळी प्रतिनिधी डॉ. सुबोध लहाने, मूर्तिजापूर प्रतिनिधी हरिहर खंडारे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
...