Join us

वाणिज्य वार्ता- फर्मागुढीत हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड केटरिंग संस्थेची पायाभरणी

By admin | Updated: September 2, 2014 22:40 IST

पणजी : गोवा पर्यटन विभागाच्यावतीने आज फर्मागुढी-फोंडा येथे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या इमारतीची पायाभरणी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) र्शीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, जीटीडीसीचे चेअरमन आमदार नीलेश काब्राल, केंद्रीय पर्यटन विभागाचे सहसचिव आनंद कुमार, गोवा पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आर. के. र्शीवास्तव ाणि जीटीडीसीच्या प्रोजेक्ट सेलचे मुख्य अभियंता एस. टी. नाडकर्णी उपस्थित होते.

फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय कॅम्पसमध्ये 40,000 चौ. मी. जागेवर ही इमारत उभी राहणार असून या संस्थेत 540 विद्यार्थ्यांना शिक्षणसंधी मिळणार आहे. याप्रसंगी र्शीपाद नाईक म्हणाले, ‘गोवा इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी ही काळाची गरज ठरणार आहे. गोव्यातील पर्यटन क्षेत्र विस्तारत असल्याने या संस्थेमुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल व गोव्यातील युवावर्गालाही रोजगारसंधी उपलब्ध होतील. या संस्थेतील 50} जागा या गोमंतकीयांसाठी राखीव ठेवण्याची मागणी आम्ही केंद्रीय पर्यटन विभागाला केली आहे. या प्रकल्पाचे काम लवकर सुरू होऊन अपेक्षित कालावधीत पूर्ण होईल असा विश्वास आहे.’
हा प्रकल्प दोन टप्प्यात उभारला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य इमारत, मुलींचे वसतिगृह उभारले जाईल, तर दुसर्‍या टप्प्यात खुले सभागृह, मुलांचे वसतिगृह, कर्मचारी निवास, कॅफेटारिया, प्राचार्यांसाठी निवासस्थान, हेल्थ क्लब, प्ले ग्राऊंड आदी सुविधा विकसित केल्या जातील. पावसाळी काळ वगळता 330 दिवसांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या संस्थेमध्ये 3 वर्षे कालावधीचा बीएस्सी पदवी, दीड वर्षे कालावधीतील फूड प्रॉडक्शन, फूड अँण्ड बिवरेज सर्व्हिस, बेकरी अँण्ड कन्फेक्शनरी, हाउसकिपींग अँण्ड फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स विषयातील पदविका असे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. तसेच दरवर्षी बांदोडा, फर्मागुडी गावातील 1000 युवा-युवतींचे कौशल्यवर्धनाबाबतचे प्रशिक्षण उपक्रमही राबवले जातील.
फोटो आहे