Join us

फोर-जीचे खोदकाम बंद करा - जोड बातमी

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

बॉक्स...

बॉक्स...
प्रभारी आयुक्त, उपायुक्तांची सभेला पाठ
सत्ताधार्‍यांनी २० नोव्हेंबरनंतर २ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सभेलाही प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर व उपायुक्त दयानंद चिंचोलीकर अनुपस्थित होते. सभेचे कामकाज प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांनी पाहले. शहर विकासाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांनी सभेला उपस्थित राहण्याची अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.

कोट...
प्रशासनाने २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सभेची टिप्पणी अद्यापही तयार केली नाही. प्रशासन जाणीवपूर्वक कामात चालढकल करीत आहे. यामुळे सभा स्थगित केली.
- उज्ज्वला देशमुख, महापौर

कोट....
फोर-जीच्या मुद्द्यावर प्रशासनासह सत्ताधार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. फोर-जीचा विषय पटलावर आला असताना, त्याची टिप्पणी तयार नाही. यापूर्वीसुद्धा भाजप-सेनेच्या नगरसेवकांनी फोर-जीचे काम थांबविण्याचा ठराव मांडला होता. आक्षेप असेल, तर शहरात काम कसे सुरू आहे? सत्ताधार्‍यांनी आर्थिक उद्देशातून फोर-जीचा विषय सभेत मांडल्याचे दिसून येते.
- साजिद खान, विरोधी पक्षनेता

कोट....
सत्तेत स्थानापन्न झाल्यापासून ते आजपर्यंत फोर-जीचा करार महापौरांनी मिळवणे अपेक्षित होते. प्रशासनाने करार केल्यानंतर अचानक खोदकाम थांबवण्याचे आदेश महापौरांनी का दिले, ही बाब संशय निर्माण करणारी आहे. सभेच्या माध्यमातून आर्थिक हेवेदावे पूर्ण करण्याचा सत्ताधार्‍यांचा उद्देश दिसून येतो.
-मदन भरगड, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक

-फोटो-१९सीटीसीएल-