Join us  

करदात्यांसाठीची सनद स्तुत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 1:50 AM

नव्या पद्धतीमध्ये करदाते व कर वसूल करणारी यंत्रणा यांच्यात अत्यंत पारदर्शक सुसंवाद करण्यात येणार असून, देशातील प्रामाणिक करदात्यांना अत्यंत सुलभ करप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

- प्रा. नंदकुमार काकिर्डे (अर्थशास्त्राचे अभ्यासक)देशाच्या प्रत्यक्ष कर पद्धतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा जाहीर करून करदात्यांना मोठा सुखाचा धक्का दिला. देशातील पॅनच्या धर्तीवर डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर (डीआयएन) ही नवीन यंत्रणा विकसित करण्यात येत असून, करदात्यांसाठी विशेष सनदही जाहीर करण्यात आली आहे.या नव्या पद्धतीमध्ये करदाते व कर वसूल करणारी यंत्रणा यांच्यात अत्यंत पारदर्शक सुसंवाद करण्यात येणार असून, देशातील प्रामाणिक करदात्यांना अत्यंत सुलभ करप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांपासून प्रत्यक्ष कर यंत्रणा निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या सुधारणा हाती घेतल्या आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सुधारणा आहेत.चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे २०२०-२१ पासूनच या नव्या सुधारणांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये करदात्यांना कमीत कमी कागदपत्रे व सहजगत्या करकायद्यांची पूर्तता करता येणार आहे. यामुळे कराचा परतावा करदात्यांना विनाविलंब, त्वरित देण्यात येणार असून, त्यामुळे करदात्यांची द्रवता वाढून त्यांच्याकडे त्वरित पैसा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे करदात्यांना गुंतवणुकीसाठी खूप लवचिक पर्यात उपलब्ध असणार आहेत. करदात्यांसाठी जाहीर केलेल्या सनदीमध्ये प्रत्येक करदात्याला प्रामाणिक करदाते म्हणूनच वागणूक दिली जाईल. मात्र एखाद्या करदात्याबाबत काही शंका घेण्यासारख्या घटना असतील तर त्यावगळता सर्व करदात्यांना सकारात्मक, सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल.यासाठी संपूर्ण करयंत्रणेमध्ये या बदलांना सामोरे जाण्याची मानसिकता निर्माण करून त्यांचे त्यादृष्टीने योग्य ते प्रशिक्षण सर्व पातळ्यांवर करण्याची गरज आहे. आपल्या देशातील कर यंत्रणांचा अनुभव लक्षात घेता करदात्यांचे जीवन सुसह्य करावयाचे किंवा नाही याबाबतची भूमिका यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.आगामी काही वर्षात देशात व्यवसाय, व्यापार करणे आणखी सुलभ केले जाणार असून, प्रामाणिक करदात्यांचा सन्मान राखला जाणार आहे. करदात्यांना हक्क व अधिकार देऊन त्याची सनद जाहीर करण्याचा हा प्रयत्न सुखद धक्का देणारा ठरेल.देशातील करदात्यांची संख्या नगण्यआजपर्यंत देशातील जे करदाते प्रामाणिकपणे व नियमितपणे कर देत आहेत, त्याचा वेळेवर भरणा करीत आहेत त्यांचा आगळ्यावेगळ्या प्रकारे गौरव करण्याची नवीन संधी केंद्र सरकारने यानिमित्ताने घेतलेली आहे. प्रामाणिक करदात्यांना योग्य, आपुलकीची वागणूक यंत्रणेकडून निश्चितपणे दिली जाईल. करयंत्रणा ही करदात्यांचा सन्मान अत्यंत संवेदनशीलपणे जपेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष करदात्यांची संख्या खूप नगण्य आहे. हे लक्षात घेऊन या नवीन करप्रणालीचा प्रारंभ दि. २५ सप्टेंबरपासून होईल, असे मोदी यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स :कर