Join us

कंपन्यांसमोर सायबर गुन्ह्यांचे आव्हान

By admin | Updated: July 21, 2014 23:46 IST

देशभरात प्रत्येक ठिकाणी कंपन्यांसाठी सायबर गुन्हे मोठे आव्हान म्हणून ठरत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे केवळ आर्थिक व्यवहारांना नुकसान पोहोचत नाही,

नवी दिल्ली : देशभरात प्रत्येक ठिकाणी कंपन्यांसाठी सायबर गुन्हे मोठे आव्हान म्हणून ठरत आहेत. सायबर गुन्ह्यांमुळे केवळ आर्थिक व्यवहारांना नुकसान पोहोचत नाही, तर बाजारातील कंपनीची प्रतिमा आणि प्रतिष्ठा यांनाच मोठा धोका पोहोचतो. यासंदर्भात केपीएमजी या खासगी संस्थेने केलेल्या एका सव्रेक्षणात 89 टक्के अधिका:यांनी हाच सूर व्यक्त केला.
अहवालानुसार, गेल्या काही वर्षापासून जागतिक सायबर गुन्ह्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता गुन्हेगार फूस लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. सायबर सुरक्षा कशी भेदावी याबाबत ते मोठे जाणकार आहेत. भारतही अशा प्रकारच्या सायबर हल्ल्याचा बळी आहे.
सायबर गुन्हे सव्रेक्षण 2क्14 नुसार, 89 टक्के अधिका:यांनी सायबर गुन्हा हे एक मोठे आव्हान असल्याची कबुली दिली. सव्रेक्षणात देशभरातील 17क् हून अधिक अधिका:यांनी सहभाग घेतला. जवळपास 51 टक्के अधिका:यांच्या मते, कंपन्यांच्या कारभाराचे स्वरूप हे सायबर गुन्हेगारांसाठी सोयीचे आहे. यामुळे येथील सुरक्षेला सहज सुरुंग लावता येऊ शकतो. 51 पैकी 68 टक्के अधिका:यांनी सांगितले की, ते दररोज सायबर सुरक्षेकडे लक्ष देऊन असतात.
मोठय़ा प्रमाणावर कंपन्यांना सायबर गुन्ह्याचा धोका असला तरी काही संस्थांनी या विरोधात स्वत:हून यंत्रणा उभी केली आहे. 
37 टक्के अधिका:यांच्या मते, सायबर हल्ल्याचा धोका बाह्य स्नेतांकडून आहे; मात्र संवेदनशील माहिती त्यांच्या हाती लागू नये म्हणून कंपन्या अशा घुसखोरांवर लक्ष ठेवून आहेत, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
वित्तीय सेवांना सायबर हल्ल्याचा सर्वाधिक धोका असल्याचे 58 टक्के अधिका:यांना वाटते. 11 टक्के अधिका:यांच्या मते, माहिती-प्रसारण, मनोरंजन तथा पायाभूत सुविधा क्षेत्रही हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील आहेत.
सायबर गुन्ह्यांशी संबंधित धोक्यापासून बचावासाठी कंपन्या स्वत:हून सुरक्षा स्थितीत सुधारणा करू शकतात, असे या अहवालात म्हटले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)