Join us  

कोर्टात केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचा दिवाळखोरीसाठी अर्ज सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:33 PM

फेसबुक वापरकर्त्यांचा डाटा चोरीचा आरोप असलेली ब्रिटनस्थित राजकीय सल्लागार संस्था केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.

नवी दिल्ली : फेसबुक वापरकर्त्यांचा डाटा चोरीचा आरोप असलेली ब्रिटनस्थित राजकीय सल्लागार संस्था केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्हा न्यायालयात दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. अमेरिकेच्या दिवाळखोरी संहितेच्या कलम ७ अन्वये हा अर्ज कंपनीने केला आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका एलएलसीची मालमत्ता सुमारे १00,00१ डॉलर ते ५00,000 डॉलर असून, देणे मात्र १ दशलक्ष डॉलर ते १0 दशलक्ष डॉलर आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीलाच कामकाज बंद करणार असल्याची घोषणा केली होती. प्रसारमाध्यमांतील नकारात्मक बातम्यांमुळे व्यवसाय तोट्यात गेल्याचे कंपनीने म्हटले आहे.