Join us

एमएफकडून ६,००० कोटींची शेअर खरेदी

By admin | Updated: September 1, 2014 00:36 IST

बाजार कल सुधारल्याने म्युच्युअल फंड कंपन्यांनी आॅगस्टमध्ये सुमारे ६,००० कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली.

नवी दिल्ली : बाजार कल सुधारल्याने म्युच्युअल फंड कंपन्यांनी आॅगस्टमध्ये सुमारे ६,००० कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअर्सची खरेदी केली. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या साडेसहा वर्षांतील ही सर्वाधिक मासिक खरेदी आहे.सलग चौथ्या महिन्यात म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराला प्राधान्य दिले गेले. याशिवाय म्युच्युअल फंड कंपन्यांनी याच काळात बाँड बाजारातही ६६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यापूर्वी फंड कंपन्यांनी जुलैमध्ये ५,००० कोटी रुपये, जूनमध्ये ३,३४० कोटी आणि मेमध्ये १०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)