Join us

खरेदीचा जोर वाढल्याने सराफा बाजारात तेजी

By admin | Updated: October 28, 2015 21:51 IST

परदेशातील बाजारात वाढलेली मागणी पाहून स्थानिक व्यापाऱ्यांनीही जोरदार खरेदी केल्याने बुधवारी सोन्याचे भाव १0 ग्रॅममागे १५५ रुपयांनी वधारून ते २७,२६५ रुपये झाले

नवी दिल्ली : परदेशातील बाजारात वाढलेली मागणी पाहून स्थानिक व्यापाऱ्यांनीही जोरदार खरेदी केल्याने बुधवारी सोन्याचे भाव १0 ग्रॅममागे १५५ रुपयांनी वधारून ते २७,२६५ रुपये झाले. सोन्याप्रमाणेच चांदीही २२५ रुपयांनी महागली. चांदीचा किलोचा भाव ३७,३५0 रुपये झाला.२0१६ पर्यंत तरी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात फेरबदल करणार नाही, अशी खात्री पटल्याने परदेशातील स्थानिक बाजारात सोन्याला मागणी वाढली. त्याचा परिणाम भारतातील बाजारावरही झाला.जागतिक स्तरावर सोन्याचे भाव 0.३ टक्क्याने वाढून ते सिंगापूरमधील बाजारात ११७0.६५ डॉलर प्रतिऔंस झाले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढती मागणी व दिवाळीची चाहूल याचा परिणाम येथील बाजारावर झाला