Join us

जगातील इंच इमारत जोड २

By admin | Updated: July 12, 2014 22:06 IST

(चौकट)

(चौकट)
इतिहासातील उल्लेख
औरंगाबाद हे शहर निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने १६१७ साली वसवले. उंच इमारती बांधण्याचा वारसा त्याच्यापासून औरंगाबादला मिळाला. याचा वारसा तत्कालीन इतिहासात नमूद आहे. शाहजादा शाहजहांबरोबर मिर्जा सादिक आसफहानी नावाचा सेनानी जुन्नर येथे होता. तो औरंगाबादेत (तेव्हाचे खडकी) आला. त्यावेळी त्याने या शहराचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, हे शहर मलिक अंबरने वसविले आहे. येथील इमारती इतक्या उंच आहेत की, त्या आकाशाला भिडल्या आहेत, असा भास होतो. जहांगीर बादशहानेही हे शहर अत्यंत सुंदर असून ते वसवण्यास मलिक अंबरला २० वर्षे लागली, अशी नोंद आत्मचरित्रात केली आहे.
(चौकट)
औरंगाबाद सर्वार्थाने सुरक्षित शहर
मध्ययुगात दिल्ली, आग्रा, पटना, सुरत, बर्‍हाणपूर, विजापूर, बीदर, गोलकोंडा ही अशी शहरे होती; परंतु तिथेही चार मजल्यांहून अधिक उंचीच्या इमारती नव्हत्या, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. औरंगाबादला तर १८ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत कोणताच धोका नव्हता. फार मोठे, भरभराटीला आलेले व्यापारी शहर व त्यातून मुगल साम्राज्याचा दख्खन सुभ्याचे ठाणे म्हणून ते अधिक सुरक्षित बनवण्यात आले होते. या शहराला कोट, परकोट असे अनेक थरांचे रक्षण होते. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत उंच इमारती येथे सर्वांत आधी बांधल्या जाऊ शकल्या.

(कॅप्शन)
इ.स. १७२० ते १७८० यादरम्यान औरंगाबादेत कोणत्या ठिकाणी उंच इमारती होत्या याचा हा नकाशा.
----------
१७२७ मध्ये बेगमपुर्‍यातील ९ मजली इमारत विकण्यात आली. तिचे अस्सल विक्रीपत्र इतिहास संशोधक शेख रमजान यांच्याकडे आहे.