Join us  

Maharashtra Budget 2018 : विकासाची गाडी चांद्याहून बांद्याला! सुधीरभाऊंच्या मदतीने केसरकरांची करामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 3:24 AM

चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा पाऊस पाडला. सुधीरभाऊंचे राज्यमंत्री (वित्त) दीपक केसरकर हे सिंधुदुर्गचे. त्यांनी आपल्या भागासाठी निधी मिळविण्यात यश मिळविले आहे.

विशेष प्रतिनिधीमुंबई - चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेल्या महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प मांडताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यावर घोषणांचा पाऊस पाडला. सुधीरभाऊंचे राज्यमंत्री (वित्त) दीपक केसरकर हे सिंधुदुर्गचे. त्यांनी आपल्या भागासाठी निधी मिळविण्यात यश मिळविले आहे.मुनगंटीवार हे तसे आक्रमक, पण केसरकर हे शिवसेनेत असूनही मवाळ स्वभावाचे आहेत. दोघांनी एकत्र येऊन चांदा ते बांदा ही योजना आणली आहे आणि त्याद्वारे चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा मास्टरप्लन आखला आहे. एकीकडे भाजपा, शिवसेनेत वेळोवेळी मतभेद चव्हाट्यावर येत असताना, भाजपा-शिवसेनेच्या या दोन मंत्र्यांनी एकमेकांशी छान जुळवून घेतल्याचे अर्थसंकल्पातही प्रतीत झाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती रॉक येथील समुद्रात अद्भुत सागरी विश्व दडलेले आहे. हे सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भारतातील पहिली बॅटरी आॅपरेटेड पाणबुडी वेंगुर्ला येथे उपलब्ध करून देण्यात येणार असून, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथील किल्ले सिंधुदुर्गच्या संवर्धनासाठी १०कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास चारशे कातळशिल्पे सापडली आहेत. त्यांचे संशोधन व पर्यटनाच्या दृष्टीकोनातून जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी अन् पठारी पर्यटनालाही चालना मिळणार असून, या जतनासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सागरी पर्यटनाचे प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र सागरतटीय व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी चालू वर्षी ९ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण कोकणाला त्याचा फायदा होईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी राज्य शासन करेल. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.खारबंधा-यांला २० कोटीकोकणातील खारबंधा-यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, राज्यातील समुद्र किनाºयांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने प्रकल्प राबविण्यात येणार आहे.गणपतीपुळेसाठी ७९ कोटीरत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ७९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आजच्या अर्थसंकल्पात त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, लांजा, जि. रत्नागिरी येथे नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आराखडा तयार करून आवश्यक ती तरतूद केली जाणार आहे.श्यामराव पेजे महामंडळास २५ कोटींचे भागभांडवलशामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी ११ कोटी २५ लाख रुपये इतक्या भागभांडवली अंशदानाची तरतूद करतानाच, या महामंडळास २५ कोटी अतिरिक्त भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८दीपक केसरकर