अकोला : बीजोत्पादनाच्या खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे बी.टी. हायब्रीड कॉटनचे भाव वाढविण्यासंबंधी नॅशनल सिडस् असोसिएशन ऑफ इंडियाने शासनावर दबाव टाकला आहे. त्याअनुषंगाने सरकारने 5 जून रोजी समिती गठित केली असून, बीटी व नॉन बीटी कॉटनच्या दराचा अभ्यास करून बियाण्यांच्या दरात सुधारणा करण्यासाठी पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश समितीला दिले आहेत.
महाराष्ट्र कापूस बियाणो पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमती निश्चित करू न शासनाने कापूस पिकाच्या बीजोत्पादनासाठी येणारा खर्च, स्वामित्व शुल्क इत्यादी बाबी विचारात घेतल्या आहेत. त्याद्वारे बीटी कापूस वाणांच्या संकरित कापूस बियाण्यांच्या किमती 2क्12 मध्ये एका अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार एका पॅकेटची किंमत 93क् रुपये ठरविण्यात आली आहे.
2क्12-13 मध्ये मजुरीत वाढ झाली, बीजोत्पादनाचा खर्च वाढला. चलनवाढ तसेच संशोधनावरील खर्चातही मोठी वाढ झाली. त्याची दखल घेत सरकारने बीटी कॉटन बियाण्यांचे दर वाढवावे, अशी मागणी 13 फेबुवारी 2क्14 रोजी नॅशनल सिडस् असोसिएशन ऑफ इंडियातर्फे शासनाला करण्यात आली होती. बीटी कॉटन बियाण्यांच्या दराचा आढावा घेऊन नव्याने दर निश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रतील तज्ज्ञांची निष्कर्ष समिती स्थापन करण्याचा शासनाचा विचारही होता. मात्र, आता सिडस् असो.चे पत्र प्राप्त होताच याकरिता त्वरेने समिती स्थापण्यात आली.
बीटी व नॉनबीटीच्या सध्याच्या दरांचा अभ्यास करू न, बियाण्यांचे सुधारित दर निश्चित करण्यासंदर्भात या समितीकडून सादर होणा:या अहवालाची आता शासनाला प्रतीक्षा आहे.
शासनाने समिती स्थापन केली आहे. तिची बैठक झाल्यावरच भाव वाढवायचे की नाही, हे ठरविले जाईल, असे वरिष्ठ कापूस संशोधन शास्त्रज्ञ डॉ. बी.आर. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कृषी शास्त्रज्ञ भरती बोर्डाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी समितीचे अध्यक्ष आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस) डॉ. बी.आर. पाटील, महाबीजचे महाव्यवस्थापक रामचंद्र नाके व कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांचा समितीमध्ये समावेश आहे.