Join us

बीएसई सेन्सेक्स ६३ अंकांनी वधारला

By admin | Updated: May 7, 2014 04:05 IST

गुंतवणूकदारांकडून रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी व आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३ अंकांनी वाढून उच्चांकावर पोहोचला़.

एफआयआयचे पाठबळ : रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि आयसीआयसीचे शेअर्स वाढले

मुंबई : गुंतवणूकदारांकडून रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी व आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६३ अंकांनी वाढून उच्चांकावर पोहोचला़ सुरुवातीच्या सत्रात एफआयआयकडून शेअर बाजाराला पाठबळ मिळाले़ यामुळे १५८ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स नफाखोरीचा बळी ठरला़ अखेरीस बाजार ६३़३० अंकांनी वाढून २२,५०८़४२ अंकांवर बंद झाला़ २८ एप्रिलनंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स उच्चांकीने वाढून बंद झाला़ नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा १५़९५ अंकांनी वाढून ६,७१५़३० अंकांवर बंद झाला़ सत्रादरम्यान निफ्टी ६,७४३ या उच्चांकावर पोहोचला होता़ परकीय संस्थागत गुंतवणूकदारांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, त्यामुळे बाजारात सकारात्मक संकेत कायम आहेत़ शेअर बाजारातील आकडेवारीनुसार, एफआयआयने सोमवारी एकूण २७९़८६ कोटी रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले़ याव्यतिरिक्त चौथ्या तिमाहीत बर्‍याच कंपन्यांचे निकाल चांगले लागले, यामुळेही बाजार बळकट झाला़ बीएसईमध्ये समाविष्ट असलेल्या ३० पैकी १४ कंपन्यांचे शेअर वाढीसह बंद झाले, तर १५ कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले़ केवळ एनटीपीसीचा शेअर ‘जैसे थे’ राहिला़ (प्रतिनिधी) आशियाई बाजारही तेजीत... आशियातील सर्वच शेअर बाजार वाढीसह बंद झाले़ चीन, सिंगापूर आणि तैवानचे बाजार ०़०३ ते ०़४७ टक्क्यांनी वाढून बंद झाले़ जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचे बाजार सुटी असल्याने बंद होते़ ४रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी, आयटीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा आणि डॉ़ रेड्डीज लॅब आदी कंपन्यांचे शेअर्स मजबूत झाले़ भारती एअरटेल, टाटा पॉवर, विप्रो, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, अ‍ॅक्सिस बँक आणि बजाज आॅटो या कंपन्यांचे शेअर्स कोसळले़