Join us

फौजदाराचे पिस्तूल चोरीप्रकरणी महिलेसह दोघांना अटक

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST

फौजदाराचे पिस्तूल चोरीप्रकरणी महिलेसह दोघांना अटक

फौजदाराचे पिस्तूल चोरीप्रकरणी महिलेसह दोघांना अटक
दोघे फरार : मिरज पोलिसांनी केली कारवाई
मिरज(जि़ सांगली) : कोल्हापुरात रेल्वे पोलीस चौकीतून फौजदार चंद्रकांत घुटुगडे यांचे सरकारी पिस्तूल व पाच काडतुसे चोरून नेल्याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा महिलेसह दोघांना अटक केली आहे. रिव्हॉल्व्हर चोरणारी मुख्य संशयित महिला फरार असल्याने अद्याप पिस्तूल पोलिसांना सापडलेले नाही.
मिरज रेल्वे पोलीस ठाण्यातील फौजदार चंद्रकांत घुटुगडे कोल्हापूर रेल्वेस्थानकात चौकीत काम करतात. महिन्यापूर्वी चंद्रकांत घुटुगडे गृहमंत्र्यांसोबत मुंबईपर्यंत बंदोबस्ताला जाऊन परत आल्यानंतर त्यांनी पिस्तूल, कागदपत्रे असलेली बॅग पोलीस चौकीत ठेवली होती. सकाळच्यावेळी पोलीस चौकीत कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घुटुगडे यांचे पिस्तूल, पाच काडतुसे व कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांना रात्रीच्या वेळी रेल्वेत प्रवाशांच्या बॅगा चोरणार्‍या हरिणा भोसले हिने पिस्तूल चोरी केल्याची माहिती मिळाली. मिरज तालुक्यातील बोलवाड येथे पारधी वस्तीवर राहणारी हरिणा हिचा रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर हरिणा व तिचा पती पृथ्वीराज भोसले दोघेही फरार झाले. पोलिसांनी चोरी करताना हरिणासोबत असलेली तिची बहीण मालन भोसले व चोरलेले पिस्तूल विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेला पुणे येथील गुन्हेगार मच्छिंद्र भोसले या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना पाच दिवस पोलीस कोठडी दिली आहे. (प्रतिनिधी)