वैष्णोदेवी यात्रेकरूंना तिकीट वाटप नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांचा उपक्रम
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
अकोला: जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या ४७० भाविक महिलांना भाजप-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते शनिवारी वर्धमान भवन येथे तिकीट वितरित करण्यात आले.
वैष्णोदेवी यात्रेकरूंना तिकीट वाटप नगरसेविका राजेश्वरी शर्मा यांचा उपक्रम
अकोला: जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या ४७० भाविक महिलांना भाजप-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते शनिवारी वर्धमान भवन येथे तिकीट वितरित करण्यात आले. प्रभागातील ४७० भाविक महिलांना वैष्णोदेवीचे दर्शन घडविण्याचा उपक्रम नगरसेविका राजेश्वरी शर्मा राबवित आहेत. येत्या २३ फेब्रुवारी रोजी भाविक महिलांना घेऊन त्या जम्मू-काश्मीरकडे रवाना होतील. तत्पूर्वी रेल्वेच्या आरक्षित तिकिटाचे वितरण वर्धमान भवन येथे करण्यात आले. आमदार गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बाजोरिया, विजय अग्रवाल यांच्या हस्ते तिकीट वितरण क रण्यात आले. यावेळी डॉ.अशोक ओळंबे पाटील, अशोक शुक्ला, अर्जून ठाकूर, संतोष अग्रवाल उपस्थित होते.-फोटो-१५सीटीसीएल-५५-