Join us  

बिटकॉइन: ४ ते ५ लाख लोकांना नोटिसा; प्राप्तिकर विभागाची देशभर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:42 AM

बेकायदेशीररीत्या बिटकॉइन एक्स्चेंजमध्ये व्यवहार करणाºया ४ ते ५ लाख लोकांना नोटिसा बजावण्याची तयारी प्राप्तिकर विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने बिटकॉइन वापरणाºया व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर छापे मारले होते.

नवी दिल्ली : बेकायदेशीररीत्या बिटकॉइन एक्स्चेंजमध्ये व्यवहार करणा-या ४ ते ५ लाख लोकांना नोटिसा बजावण्याची तयारी प्राप्तिकर विभागाने केली आहे. गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने बिटकॉइन वापरणा-या व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर छापे मारले होते.प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, बिटकॉइन एक्स्चेंजेसवर देशभरातील २० लाख संस्था व व्यक्तींची नोंदणी आहे. त्यापैकी ४ ते ५ लाख जण सक्रिय आहेत. ते व्यवहार आणि गुंतवणूक करीत असल्याचे आढळून आले आहे.गेल्या आठवड्यातील छाप्यांची कारवाई प्राप्तिकर विभागाच्या बंगळुरू शाखेने केली होती. या छाप्यांत जी माहिती हाती आली ती आता देशभरातील ८ प्राप्तिकर कार्यालयांना पाठविण्यात आली आहे. या कार्यालयांकडून विस्तृत तपास करण्यात येईल. ज्या व्यक्ती आणि संस्थांचे रेकॉर्ड तपासात आढळले त्यांची कर चुकवेगिरीच्या आरोपाखाली चौकशी केली जात आहे. त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. बिटकॉइनमधील गुंतवणूक आणि व्यवसायावर त्यांना आता भांडवली लाभ कर द्यावा लागेल, असे एका प्राप्तिकर अधिका-याने सांगितले.बिटकॉइनच्या व्यवहारातील ४ ते ५ लाख व्यक्ती व संस्थांची आर्थिक उलाढाल प्रचंड मोठी असल्याचे आढळून आले आहे. त्यांनाच नोटिसा बजावण्यात येत आहेत. आधी त्यांच्याकडून त्यांची व्यावसायिक माहिती मागविली जाईल. त्यानंतर त्यांच्याकडे कर मागणी नोंदविली जाईल. बिटकॉइन हे आभासी चलन असून, ते बेकायदेशीर आहे. या अनुषंगानेही योग्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे या अधिका-याने सांगितले.अधिका-याने सांगितले की, गेल्या आठवड्यातील छाप्यांची कारवाई प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३३ ए अन्वये करण्यात आली होती. बिटकॉइनमधील गुंतवणूक करणा-यांची ओळख पटविणे, त्यांनी केलेले व्यवहार हुडकून काढणे, व्यवहार कोणाशी झाले त्याचीओळख पटविणे आणि संबंधित बँक खाती शोधून काढणे तसेच यासंबंधीचे पुरावे गोळा करणे हा या कारवाईचा उद्देश होता.बिटकॉइनमध्ये प्रचंड गुंतवणूक-जेथे हे आर्थिक व्यवहार होत होते, तेथे प्राप्तिकर विभागाच्या अधिका-यांनी अचानक छापेमारी केली होती. या लोकांच्या घरावर छापेमारी करण्यात आलेली नव्हती. प्रचंड प्रमाणात रोख रक्कम असलेल्या लोकांनी आपला पैसा मोठ्या प्रमाणात बिटकॉइनमध्ये गुंतविला असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली होती.

टॅग्स :बिटकॉइन