Lokmat Money > बिझनेस न्यूज > काळजी घ्या, नाेकऱ्यांवर घाेंगावत आहे संकट! कंपन्यांकडून नाेकरभरतीला ब्रेक, नियुक्त्याही घटणार

काळजी घ्या, नाेकऱ्यांवर घाेंगावत आहे संकट! कंपन्यांकडून नाेकरभरतीला ब्रेक, नियुक्त्याही घटणार

सुमारे ३ हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, वार्षिक आणि तिमाही आधारावर नियुक्तीचे प्रमाण घटणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 09:26 AM2023-01-06T09:26:47+5:302023-01-06T09:27:31+5:30

सुमारे ३ हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, वार्षिक आणि तिमाही आधारावर नियुक्तीचे प्रमाण घटणार आहे. 

Be careful, the crisis is looming over the workers! | काळजी घ्या, नाेकऱ्यांवर घाेंगावत आहे संकट! कंपन्यांकडून नाेकरभरतीला ब्रेक, नियुक्त्याही घटणार

काळजी घ्या, नाेकऱ्यांवर घाेंगावत आहे संकट! कंपन्यांकडून नाेकरभरतीला ब्रेक, नियुक्त्याही घटणार

नवी दिल्ली : जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये मंदीच्या भीतीने माेठी कर्मचारी कपात हाेत आहे. भारतात तुलनेने प्रमाण कमी असले तरी पुढील काही महिन्यात कार्पाेरेट कंपन्यांकडून नव्या भरतीबाबत सावध पावित्रा घेऊ शकतात. महागाई आणि मंदीच्या वाढत्या चिंतेमुळे  नाेकरभरती कमी हाेऊ शकते, असा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
सुमारे ३ हजारांहून अधिक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार, वार्षिक आणि तिमाही आधारावर नियुक्तीचे प्रमाण घटणार आहे. 

गोपनीय माहिती फाेडली
ॲमेझॉनचे सीईओ अँडी जॅस्सी यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कारवाया आम्ही गोपनीय ठेवतो. तथापि, एका कर्मचाऱ्याने ही बातमी बाहेर फोडली. कामावरून काढण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस आम्ही सेपेरेशन पेमेंट, ट्रान्झिरशनल हेल्थ इन्शुरन्स लाभ आणि एक्स्टर्नल जॉब प्लेसमेंट सपोर्ट देणार आहोत.

या कंपन्या लोकांना घरी बसविणार
खाद्य वितरण कंपनी दूरदर्श आयएनसी, केबिल टीव्ही कंपनी एएमसी नेटवर्क्स आयएनसी, क्रिप्टो चलन एक्सचेंज कारकेन, बँक समूह सिटीग्रुप आयएनसी, मॉर्गन स्टॅन्ले आणि इंटेल कॉर्प या कंपन्यांनीही कर्मचारी कपात करणार आहेत.

ॲमेझॉनकडून आणखी घट
ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने या महिन्यात १८ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा अचानक निर्णय घेतला आहे. 
याचा फटका कंपनीच्या स्टोअर तसेच पीपल, एक्सपिरियन्स व टेक्नॉलॉजी (पीएक्सटी) टिमला बसणार आहे. 

नाेकऱ्या देणाऱ्या कंपन्या, संस्था सध्या जगभरातील मंदीच्या सावटामुळे सावध आहेत. गेल्या तिमाहीत आयटी क्षेत्रातील उलथापालथही याच कारणामुळे झाली. अर्थतज्ज्ञांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीचा अंदाज वर्तविला हाेता, त्यामुळे राेजगार प्रभावित हाेण्यास सुरुवात झाली आहे.
- जाेनास प्रायसिंग, 
अध्यक्ष, मॅनपाॅवर समूह

Web Title: Be careful, the crisis is looming over the workers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.