Join us  

‘आधार’मुळे वाचले तब्बल ९ अब्ज डॉलर! नंदन नीलेकणी यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:32 AM

भारत सरकारच्या आधार कार्ड योजनेत आतापर्यंत १ अब्ज लोकांनी नोंदणी केली असून, कल्याणकारी योजनांतील बनावट लाभार्थी यादीतून गायब झाल्यामुळे सरकारचे तब्बल ९ अब्ज डॉलर वाचले आहेत. आधारचे शिल्पकार नंदन नीलेकणी यांनी ही माहिती दिली.

वॉशिंग्टन : भारत सरकारच्या आधार कार्ड योजनेत आतापर्यंत १ अब्ज लोकांनी नोंदणी केली असून, कल्याणकारी योजनांतील बनावट लाभार्थी यादीतून गायब झाल्यामुळे सरकारचे तब्बल ९ अब्ज डॉलर वाचले आहेत. आधारचे शिल्पकार नंदन नीलेकणी यांनी ही माहिती दिली.मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने आधार योजना सुरू केली होती. ही योजना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेही कायम ठेवली आहे. स्वत:पंतप्रधान मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांचा योजनेला पाठिंबाआहे, असे नीलेकणी यांनीसांगितले.६२ वर्षीय नीलेकणी यांनी अलीकडेच आधार प्राधिकरणाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊन भारतातील दुसºया क्रमांकाची मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा अ-कार्यकारी चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.जागतिक बँकेने आयोजित केलेल्या ‘विकासासाठी डिजिटल अर्थव्यवस्था’ या विषयावरील गट चर्चेत नीलेकणी यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, योग्य डिजिटल पायाभूत व्यवस्था उभी केल्यास विकसनशील देशांना विकासाच्या मार्गावर उडी घेणे सोपे आहे. आधार योजना हे त्याचे एक उदाहरण आहे. आधारमध्ये आतापर्यंत १ अब्जापेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. आधारमुळे कल्याणकारी योजनांत होणाºया घोटाळ्यांना लगाम बसला आहे. आधार जोडणीमुळे बनावट लाभार्थी आपोआप दूर झाले. याचा परिणाम म्हणून भारत सरकारचे ९ अब्ज डॉलर वाचले आहेत.आंतरराष्टÑीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित गट चर्चेत बोलताना नीलेकणी यांनी पुढे म्हटले की, भारतात आज ५० कोटी लोकांची बँक खाती आधारशी जोडलेली आहेत.या खात्यांवर सरकारने १२ अब्ज रुपये इलेक्ट्रानिक यंत्रणेच्या माध्यमातून ‘वास्तव वेळे’त (रिअल टाइम) हस्तांतरित केले आहेत. ही जगातील सर्वांत मोठी रोख हस्तांतरण यंत्रणा ठरली आहे. अशा अनेक चांगल्या बाबी आधारने निर्माण केल्या आहेत. माझा असा ठाम विश्वास आहे की, तुम्ही योग्य डिजिटल पायाभूत व्यवस्था उभी केल्यास तुम्हाला उडी घेता येते.नव्या डाटा अर्थव्यवस्थेत ओळख पडताळणी, सुलभ अदायगी, दस्तविरहित व्यवहार यांना फार महत्त्व आहे. तेच भारताने केले आहे, असे सांगून निलेकणी म्हणाले की, भारत हा जगातील एकमेव देश आहे, जेथे १ अब्ज लोक दस्तविरहित, रोखविरहित व्यवहार त्यांच्या मोबाइल फोनवरून करू शकतात. त्यामुळे व्यवहारांचा खर्च कमी झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :आधार कार्डनंदन निलेकणी