Join us  

बँकांनो, कर्ज वितरण प्रणाली सुधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:56 AM

सर्वसामान्य व छोट्या कर्जदारांना कर्ज देताना प्रश्नांची सरबत्ती आणि मोठ्या कर्जदारांना पायघड्या, ही पद्धत बँका व वित्त संस्थांनी बदलण्याची नितांत आवश्यकता असल्याचे लघू कर्ज वितरणासंबंधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई : सर्वसामान्य व छोट्या कर्जदारांना कर्ज देताना प्रश्नांची सरबत्ती आणि मोठ्या कर्जदारांना पायघड्या, ही पद्धत बँका व वित्त संस्थांनी बदलण्याची नितांत आवश्यकता असल्याचे लघू कर्ज वितरणासंबंधीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.भारतीय वित्तीय नियोजन मानके मंडळ (एफपीएसबी) व आयआयएम लखनऊ यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे.देशातील छोट्या श्रेणीतील कर्ज वितरण करणाºया जवळपास ३० बँका आणि वित्त पुरवठादार संस्थांचा या दोन संस्थांनी संयुक्तपणे अभ्यास केला. त्यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक कर्ज आणि वस्तूंसाठी दिल्या जाणाºया लघू कर्जांचा अभ्यास केला. त्याचा अहवाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.आयआयएम लखनऊमधील प्रा. देवाशिष दासगुप्ता म्हणाले की, छोट्या रकमेचे कर्जदार हे वित्तीयदृष्ट्या अशिक्षित असतात. त्यांना केवळ पैशांची निकड असते. आमच्या अभ्यासानुसार त्यांच्याकडील कर्जबुडव्यांचे प्रमाण हे अत्यल्प आहे. पण त्याउलट कर्ज घेऊन पोबारा करणारा, कर्ज बुडवणारा हा कायम मोठा कर्जदारच असतो, जो धनाढ्य असतो आणि वित्तीयदृष्ट्या शिक्षितही. त्यामुळे निकड असलेल्या छोट्या कर्जदाराला बँका आणि वित्त संस्थांनी सढळ हस्ते कर्जपुरवठा करायला हवा. पण सध्याचे चित्र उलट आहे आणि त्याचे नकारात्मक निकालही समोर आहेत. हेच या अहवालात आम्ही मांडले आहे. एफपीएसबीचे उपाध्यक्ष व सीईओ रणजीत मुधोळकर यांनी सांगितले की, बँका आणि वित्तसंस्था कायम सिबिल स्कोर सकारात्मक असलेल्यांना कर्ज वितरणात प्राधान्य देतात.पण छोटे कर्जदार हे सहसा कधीच कर्ज न घेतलेले असतात. यामुळे त्यांचा सिबिल स्कोरच नसतो. त्यांना मात्र कर्ज घेताना खूप अडचणी येतात. हे चित्र बदलण्यासाठीच आम्ही हा अभ्यास केला. हा अभ्यास संबंधित बँका व वित्तसंस्थांसमोरही मांडण्यात आला आहे.नेमका मासिक हफ्ता कर्ज देण्याआधी सांगाकर्ज वितरणासाठी कर्जदाराची सक्षमता स्पष्ट करादस्तावेज व अन्य खर्च आधीच सांगा, छुपे खर्च नकोकर्जाबाबत वेळोवेळी सोप्या भाषेत माहिती द्याकर्जासंबंधीची माहिती प्रमुख भाषेत उपलब्ध करा