Join us  

"लॉकर"ला काही झाल्यास बँका जबाबदार नाही"

By admin | Published: June 25, 2017 11:50 PM

कोणत्याही सरकारी बँकेमधील लॉकरमध्ये जमा करण्यात आलेली किंमती वस्तूची चोरी झाल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास याला बँक जबाबदार राहणार नाही

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 : कोणत्याही सरकारी बँकेमधील लॉकरमध्ये जमा करण्यात आलेली किंमती वस्तूची चोरी झाल्यास किंवा काही दुर्घटना घडल्यास याला बँक जबाबदार राहणार नाही, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती उघड झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकारी क्षेत्रामधील १९ बँकांनी माहितीच्या अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बँकेतील लॉकरला बँक जबाबदार राहणार नाही, अशी माहिती दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते कुश कालरा यांनी माहितीच्या अधिकाराखाली हा प्रश्व विचारला होता. बँकेच्या उत्तरानंतर कालरा यांनी बँकेच्या विरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. जर बँकेतील लॉकरमध्ये चोरी झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास बँक ग्राहकांना किती नुकसान भरपाई द्यावी, यासंदर्भात आरबीआयने बँकांना कोणताही आदेश दिला नाही, असे रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.आमचे आणि बँक ग्राहकांचे संबंध हे घर मालक आणि भाडेकरू यासारखे आहेत, असे सांगून बँकांनी नुकसान भरपाई देण्यासंदर्भात आपले हात झटकले आहेत. लॉकर हे बँकेत असले तरी लॉकरमध्ये ठेवलेल्या सामानाला ग्राहक स्वतःच जबाबदार आहेत, असे बँकांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. काही बँकांनी आपल्या हायरिंग अग्रिमेंटचा दाखला दिला. जर बँकेत चोरी झाली, गृह युद्ध, किंवा दुर्घटना घडली तर यासर्व प्रकाराला ग्राहकच जबाबदार राहतील. बँकेतील लॉकरच्या सुरक्षेसाठी बँक सर्व प्रयत्न करेन परंतु तरीही नुकसान झाल्यास याला बँक जबाबदार राहणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले.