Join us

बजाज आॅटोमध्ये ११ हजारांची वेतनवाढ

By admin | Updated: August 18, 2014 02:32 IST

बजाज आॅटो व्यवस्थापन आणि कंपनीच्या चाकण येथील युनिटमधील विश्व कल्याण कामगार संघटनेमध्ये दीड वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षावर समोपचाराने तोडगा काढण्यात आला

पिंपरी : बजाज आॅटो व्यवस्थापन आणि कंपनीच्या चाकण येथील युनिटमधील विश्व कल्याण कामगार संघटनेमध्ये दीड वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षावर समोपचाराने तोडगा काढण्यात आला असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वेतन करार नुकताच झाल्याने कर्मचाऱ्यांना १0 ते ११ हजार रुपये वेतनवाढ देण्यात आली आहे.आकुडीर्तील श्रमशक्ती भवनामध्ये झालेल्या कामगारांच्या सभेत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेत सुसंवाद व सौदार्हाचे संबंध प्रस्थापित झाल्याचे सांगण्यात आले. वेतन कराराची माहिती मिळताच कामगारांनी समाधान व्यक्त केले. कामगारांना किमान १० हजार आणि कमाल ११ हजार २८० रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे. वेतनवाढीची ६० टक्के रक्कम ही मूळ वेतन, अधिक महागाई भत्ता व ४० टक्के रक्कम अन्य भत्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. बदलता महागाई भत्ता प्रचलित पध्दतीने सुरु राहणार आहे. कामगारांना कॅन्टीन सुविधा मोफत करण्यात आली असून वाहतूक भत्ता १८० रुपये कमी करण्यात आला आहे. वार्षिक १२ हजार रूपये असा भत्ता दिला जात होता. तो एक हजार रूपये या प्रमाणे दर महिन्यास अदा केला जाणार आहे. दिवाळीपूर्वी कामगारांना फरकाची रक्कम दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)