Join us  

पॅनकार्ड क्लबच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा स्वस्तात लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:29 AM

पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात जप्त केलेल्या काही मालमत्तांचा लिलाव ‘सेबी’ने रेडीरेकनपेक्षाही कमी दरात केला आहे.

- चिन्मय काळेमुंबई : पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात जप्त केलेल्या काही मालमत्तांचा लिलाव ‘सेबी’ने रेडीरेकनपेक्षाही कमी दरात केला आहे. त्यामुळे लिलावातून येणाऱ्या रकमेतून गुंतवणूकदारांना केली जाणारी भरपाईची रक्कमही कमी होण्याची शक्यता आहे.गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या ७०३५ कोटी रुपयांतून क्लबने ८४ ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या. राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांना याची झळ बसली. घोटाळा उघड होताच सेबीने क्लबच्या मालमत्ता जप्त केल्या. पैकी तीन मालमत्तांच्या लिलावात सेबीला रेडीरेकनर दराच्या तुलनेत १८ कोटी कमी मिळाले आहेत.>गोव्याचे रिसॉर्टफक्त ५.२१ कोटींतपॅनकार्ड क्लबने दक्षिण गोव्यातील सॉलकेट तालुक्यातील वार्का गावात ‘युनायटेड २१’ नावाचे रिसॉर्ट खरेदी केले होते. २०३५ चौरस मीटर अर्थात २१,९०४ चौरस फूटावर हे रिसॉर्ट होते. वार्का येथील अशा प्रकारच्या हॉटेलचा सध्याचा बाजारदर १२,५०० रुपये तर रेडी रेकनर दरही ८,००० रुपये प्रति चौरस फूट आहे.पण लिलावात हे आलिशान रिसॉर्ट जेमतेम २३८० रुपये प्रति चौरस फूट दराने ५.२१ कोटी रुपयांना विकले गेले. या व्यवहाात सुमारे १२.३१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.>आणखी किती नुकसान?या सर्व लिलावात गुंतवणूकदारांचे थेट नुकसान नाही. पण ‘सेबी’ लिलावाद्वारे आलेले पैसेच गुंतवणूकदारांना परत करणार आहे. त्यामुळे लिलाव जेवढ्या स्वस्तात तेवढी कमी रक्कम गुंतवणूकदारांना मिळेल. उर्वरित ८१ मालमत्तांपैकी २१२० कोटी रुपयांच्या २४ मालमत्तांचा लिलाव९ मे रोजी होत आहे.>पुणे-मुंबईतील मालमत्तेत ६.४० कोटींचे नुकसानपॅनकार्ड क्लबचा पुण्यातील बाणेर भागात ९३५० चौरस मीटरचा भूखंड होता. २३,१६० रुपये प्रति चौरस मीटर रेडी रेकनरनुसार त्याचा लिलाव किमान २१.६५ कोटी रुपयांना होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या मालमत्तेची विक्री १७.१८ कोटी रुपयांना झाल्याने त्यात ४.४७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईतील वर्सोवा भागातील म्हाडा ले-आऊटमधील ३११.०४ चौरस मीटरच्या रो हाऊसचा लिलाव २.७० कोटी रुपयांना झाला. त्या जागेचा रेडी रेकनर दर १.४९ लाख रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. त्यानुसार हा लिलाव किमान ४.६३ कोटी रुपयांना होणे अपेक्षित होते. त्यात १.९३ कोटी कोटी रुपयांचे नुकसान झाले.