Join us

तब्बल 8 जीबी रॅम असणारा आसुसचा सुपर फोन

By admin | Updated: January 5, 2017 18:41 IST

8 जीबी रॅम असणारा हा जगातला पहिला फोन असल्याचा कंपनीचा दावा

ऑनलाइन लोकमत

लास वेगास, दि. 5 - स्मार्टफोन निर्माती कंपनी 'आसुस'ने  ‘झेनफोन एआर’ हा तब्बल 8 जीबी रॅम असणारा फोन प्रदर्शीत केला आहे. 8 जीबी रॅम असणारा हा जगातला पहिला फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. लास वेगासमध्ये आयोजित CES 2017 या कार्यक्रमात कंपनीने हा फोन प्रदर्शित केला. 

या फोनला पहिल्यांदाच ऑग्युमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीचा सपोर्ट देण्यात आला आहे. अर्थातच गुगलच्या टँगो आणि ‘डे ड्रीम’ या प्रकारांना सपोर्ट करणारा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. 
 
या फोनमध्ये  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर,  3000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी,   तसेच 5.7 इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या 7.0 नोगट प्रणालीवर चालणारे आहे.  सोनी IMX318 चा  23   मेगापिक्सल्स  क्षमतेचा मुख्य कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय मागील बाजूस फिशआय लेन्स असणारा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या किंमतीबाबत तसेच भारतात हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.