Join us

आशियाच्या बाजारात तेलाचे भाव घसरले

By admin | Updated: July 9, 2015 01:38 IST

युरोझोनमध्ये ग्रीसचे भवितव्य काय राहील या भीतीतून बुधवारी आशियात तेलाच्या किमती खाली आल्या. अमेरिकेतील महत्त्वाची तेल

सिंगापूर : युरोझोनमध्ये ग्रीसचे भवितव्य काय राहील या भीतीतून बुधवारी आशियात तेलाच्या किमती खाली आल्या. अमेरिकेतील महत्त्वाची तेल कंपनी वेस्ट टेक्सास इंटिरमिजएटचे तेल आॅगस्टच्या डिलिव्हरीसाठी बॅरलमागे १४ सेंटस्ने घसरून ५२.१९ अमेरिकन डॉलरवर आले. ब्रेंटचे तेलही बॅरलमागे १३ सेंटस्ने स्वस्त होऊन ५६.७२ अमेरिकन डॉलरवर आले. या दोन्ही तेलाच्या किमतीत याआधी किंचितशी वाढ झाली होती. तेलाला जागतिक पातळीवरही अनुकूल दिवस दिसत नाहीत, असे येथील आयजी मार्केटस्चे बाजार धोरणकर्ते बर्नार्ड आॅ यांनी म्हटले. ग्रीसमधील स्थिती बिघडल्यामुळे तेलासारख्या उत्पादनाला फटका बसत आहे.