होर्डिंग्जसाठी समितीचे गठण मनपाचे इच्छुकांना आवाहन
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
अकोला : शहरातील अनधिकृत होर्डिंगना आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यानंतर आता शहर समिती व झोननिहाय समितीचे गठण करण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
होर्डिंग्जसाठी समितीचे गठण मनपाचे इच्छुकांना आवाहन
अकोला : शहरातील अनधिकृत होर्डिंगना आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यानंतर आता शहर समिती व झोननिहाय समितीचे गठण करण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.शहर समितीची बैठक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनानंतर दुपारी १२ वाजता घेतली जाईल. यामध्ये मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी, पोलीस अधिकारी व झोननिहाय समितीमार्फत आलेल्या सदस्यांचा समावेश राहील. झोननिहाय समितीमध्ये पेन्शनर संघटना, बँक मॅनेजर, पत्रकार संघाचे पाच प्रतिनिधी, महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक, सामाजिक संघटना, बार असोसिएशनने सूचित केलेले पाच प्रतिनिधी, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, महिला संघटनेच्या प्रतिनिधी, महाविद्यालयातील किमान पाच विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच फ्लेक्स प्रिंटिंग व होर्डिंगचा व्यवसाय करणार्या प्रतिनिधींचा समावेश राहील. इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.