Join us  

अंगणवाडी स्पेशल ड्राईव्ह़़़़शिवाजी ़़़

By admin | Published: August 29, 2015 1:03 AM

4208 अंगणवाड्यात आहेत 2़65 लाख चिमुकले!

4208 अंगणवाड्यात आहेत 2़65 लाख चिमुकले!
सोलापूर: जिल्?ात जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली असलेल्या मिनी आणि मोठय़ा अशा एकूण 4208 अंगणवाड्या कार्यरत आहेत़ यामध्ये 6 महिने ते 6 वर्षे वयोगटातील 2 लाख 65 हजार 566 चिमुकले आहेत़ त्यांना पूरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास करण्यावर या अंगणवाड्यात विशेष लक्ष दिले जात आह़े अगदी कमी मानधन असले तरीही घरची जबाबदारी सांभाळून अंगणवाडी मदतनिस आणि सेविका उत्साही वातावरणात कार्यरत आहेत़
या अंगणवाड्यातून फक्त छोट्या मुलांकडेच लक्ष दिले जात नाही तर स्तनदा माता, गरोदर माता यांच्या देखील आरोग्याची काळजी घेतली जात़े जुलैअखेरचा विचार करता 26 हजार 553 गरोदर मातांना पूरक पोषण आहार दिला जात आह़े तर 21 हजार 409 स्तनदा मातांना देखील पूरक पोषण आहार दिला जातो़ शिक्षण खात्याप्रमाणेच खूप मोठी यंत्रणा अंगणवाडीमध्ये कार्यरत आह़े
इन्फो ़़
तालुकानिहाय अंगणवाड्या आणि मुलांची संख्या
-अक्कलकोट ( 368)-21664
-बार्शी ( 167)-9809
-बार्शी-वैराग ( 368)-21664
-करमाळा (372)-18075
-माढा-कुडरूवाडी (257)-14910
-कुडरूवाडी (टेंभुर्णी) (193)-12546
-माळशिरस (440)-26700
-मोहोळ (428)-25764
-उ़ सोलापूर (175)-13677
-पंढरपूर (267)-19871
-पंढरपूर 2 (197)- 12063
-सांगोला (208)-14010
-सांगोला-कोळा (188)-10853
-द़ सोलापूर ( 295)-23480
एकूण 4207 अंगणवाड्या- 265566 मुले

चौकट़़़़
प्रकल्प अधिकार्‍यांची तब्बल 15 पदे रिक्त
एकात्मिक बालविकास सेवा योजना ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविली जात़े एकूण 16 बालविकास प्रकल्प अधिकारी पदे आहेत; मात्र यातील तब्बल 15 पदे रिक्त आहेत़ शासन पातळीवर याचा पाठपुरावा सुरू आह़े अंगणवाडी सेविका तसेच मदतनिस यांची रिक्त पदे देखील भरली जातात़ जिल्?ात 3268 मोठय़ा अंगणवाड्या तर 944 मिनी अंगणवाड्या आहेत़ जिल्?ासाठी 4213 अंगणवाड्या मंजूर आहेत त्यापैकी 4208 कार्यरत आहेत़ 121 अंगणवाडी पर्यवेक्षिकेची पदे मंजूर असून त्यात 118 कार्यरत असून 13 पदे रिक्त आहेत़

कोट़़़
जिल्?ात अनेक अंगणवाड्या अतिशय चांगल्या पद्धतीने चालविल्या जात आहेत़ मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाकडे आमच्या मदतनिस, सेविका लक्ष देतात़ अनेक अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून देखील विविध उपक्रम राबविले जात आहेत़ आदर्श अंगणवाड्या अनेक आहेत़ स्वत:चे मूल समजून प्रत्येक मुलांकडे लक्ष दिले जात आह़े
अशोक सावंत
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि़प़ (बालकल्याण)



चौकट़़़
90 अंगणवाड्या भरतात उघड्यावर
जिल्?ात एकूण 4208 अंगणवाड्या असून यातील 90 अंगणवाड्या उघड्यावर भरतात़ 554 अंगणवाड्या खासगी ठिकाणी किंवा देवळात भरतात़ 148 अंगणवाड्या कुठेही भरविल्या जातात़ 249 अंगणवाड्या खासगी घरात, मंदिरात किंवा समाजमंदिरात भरतात़ 245 अंगणवाड्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरतात़ 675 अंगणवाड्या या प्राथमिक शाळेत भरतात़ 2247 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत़ जिल्हा नियोजन समितीमधून गेल्यावर्षी 14़50 कोटी निधी मिळाला यातून 240 अंगणवाड्या बांधण्याचे काम सुरू आह़े यंदा 15 कोटींचा निधी मिळाला असून यातून 250 अंगणवाड्या बांधल्या जात असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आल़े