Join us  

अक्षय कुमार, सलमान सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 1:00 AM

बॉलिवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार व सलमान खान फोर्ब्सच्या सर्वाधिक पैसा कमविणा-या सेलिब्रेटींच्या यादीत अनुक्रमे ७६ व ८२व्या स्थानी आहेत.

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार व सलमान खान फोर्ब्सच्या सर्वाधिक पैसा कमविणा-या सेलिब्रेटींच्या यादीत अनुक्रमे ७६ व ८२व्या स्थानी आहेत. अक्षय कुमारने वर्षभरात कर भरणा करण्याआधी २७५.४० कोटी कमविले आहेत. तर सलमानने २५६.३६ कोटी रुपये कर भरणा करण्याआधी कमावल्याचे फोर्ब्सने नमूद केले आहे. दोघांच्याही कमाईत मागील वर्षीपेक्षा २२ टक्के वाढ झाली आहे.जगातील ११ सेलिब्रेटींची वार्षिक कमाई १० कोटी डॉलर्सहून (६८० कोटी रुपये) अधिक आहे. इतकी कमाई करणाºया सेलिब्रेटींच्या संख्येत दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे.अमेरिकन बॉक्सिंग निवेदक फ्लॉइड मेवेदर २८.५० कोटी डॉलर्स अर्थात १९३८ कोटी रुपयांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो (१०), टेनिसपटू रॉजर फेडरर (२३), गायक बियान्स (३५), गोल्फपटू टायगर वूड्स (६६) यांचाही या यादीत समावेश आहे.