Join us

अकोला महापालिकेत पुन्हा खातेबदल

By admin | Updated: June 20, 2014 21:33 IST

अकोला महापालिकेत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी पुन्हा खातेबदल केले.

अकोला : महापालिकेची विस्कटलेली प्रशासकीय गाडी रुळावर आणण्यासाठी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी पुन्हा खातेबदल केले. क्षेत्रीय अधिकार्‍यांसह इतर अधिकार्‍यांवर विविध विभागातील महत्त्वपूर्ण कामकाजाच्या जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या. यामध्ये नगर सचिव पदाचा प्रभार पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांच्याकडे तसेच बिडवे यांच्याकडील शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी पदाचा पदभार प्रदीप चोरे यांच्याकडे सोपविण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे यांच्याकडे शहर बस वाहतूक व निपरिवहनचा प्रभार देण्यात आला. एलबीटीचे अधीक्षक दिलीप जाधव यांच्याकडे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या प्रकल्प अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांना बाल कामगार, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कामकाजासह आयुक्तांचे विशेष कार्य अधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. खातेनिहाय बदल करताना आयुक्तांनी पद्धतशीर नियोजन केल्याचे दिसून येते. यामुळे निश्चितच प्रशासकीय कामकाजात गती येण्याची अपेक्षा आहे.