Air India: देशभरात इंडिगो एअरलाइनची विमान वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. फ्लाइट रद्द होणे असो, लगेज उशीरा मिळणे असो वा रिफंडशी संबंधित समस्या असो, प्रवासी या सर्व गोष्टींमुळे त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत, एअर इंडियाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. कोणत्याही प्रवाशाला अतिरिक्त पैसे मोजावे लागू नयेत किंवा गैरसोयीचा सामना करावा लागू नये हे आमचे ध्येय असल्याचे एअरलाइन्सचे म्हणणे आहे.
भाडे वाढ रोखली
एअर इंडियाच्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये आणि कोणालाही अडचणीत प्रवास करावा लागू नये, यासाठी 4 डिसेंबर 2025 पासून देशांतर्गत इकॉनॉमी प्रवासासाठी तात्पुरते निश्चित भाडे लागू केले आहे. म्हणजेच उड्डाण संकटाच्या काळात तिकीटांचे दर अचानक वाढवले जाणार नाहीत. साधारणपणे मागणी वाढली की, ऑटोमेटेड रेव्हेन्यू मॅनेजमेंट सिस्टीम तिकीटांच्या किंमती वाढवते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता भाडेवाढीचा निर्णय स्थगित केला आहे.
तिकिट बदलणे आणि रद्द करणे पूर्णपणे मोफत
प्रवाशांना दिलासा देत एअर इंडिया समूहाने जाहीर केले की, 4 डिसेंबर 2025 पर्यंत बुक केलेल्या तिकिटांसाठी तिकीट बदलणे आणि रद्द करणे पूर्णपणे शुल्कमुक्त असेल. म्हणजेच, प्रवाशांकडून कोणतेही जास्तीचा शुल्क आकारला जाणार नाही. प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यास, त्यांना पूर्ण परतावा मिळेल. ही सवलत 8 डिसेंबर 2025 पर्यंत एकदाच लागू आहे.
कॉल सेंटरमध्ये अतिरिक्त कर्मचारी
तक्रारींचा वाढता ओघ आणि लांबलेल्या प्रतीक्षा वेळेमुळे एअरलाइनने त्यांच्या 24x7 कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. यासाठी एअर इंडिया हेल्पलाइन: +91 11 6932 9333 आणि एअर इंडिया एक्सप्रेस: +91 124 443 5600 / +91 124 693 5600 हे नंबर्स आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसचे ग्राहक WhatsApp चॅटबॉट “TIA”, वेबसाइट, मोबाइल अॅप आणि फेसबुक मेसेंजरद्वारेही बदल करू शकतात.
मोफत अपग्रेडची सुविधा
प्रवाशांना जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी कंपनीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. फ्लाइटमध्ये जागा रिकामी असल्यास इकॉनॉमी प्रवाशांना मोफत अपग्रेड दिला जाऊ शकतो. काही व्यस्त मार्गांवर अतिरिक्त फ्लाइट्सही सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सैनिकांना मिळणाऱ्या सवलती कायम ठेवल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.
Web Summary : Amid Indigo's flight disruptions, Air India freezes fares, waives change/cancellation fees until December 8th, adds call center staff, and offers free upgrades when available to ease passenger inconvenience.
Web Summary : इंडिगो की उड़ान में व्यवधानों के बीच, एयर इंडिया ने किराए स्थिर किए, 8 दिसंबर तक बदलाव/रद्द शुल्क माफ किए, कॉल सेंटर के कर्मचारियों को बढ़ाया और यात्रियों की असुविधा को कम करने के लिए मुफ्त अपग्रेड की पेशकश की।