चोरट्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू अहमदनगर : आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
पाथर्डी (जि. अहमदनगर) : मिरी येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात गोरख रावसाहेब झाडे (२२) याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मिरी ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको आंदोलन केले.
चोरट्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू अहमदनगर : आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको
पाथर्डी (जि. अहमदनगर) : मिरी येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात गोरख रावसाहेब झाडे (२२) याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मिरी ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको आंदोलन केले.सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास दोन चोरटे तोंडाला फडके गुंडाळून झाडे वस्तीवर आले. मीरा रावसाहेब झाडे पावसाचे पाणी भरीत होत्या. चोरट्यांना पाहून त्या घरात पळाल्या. शेजारच्या खोलीत गोरख व त्याचा भाऊ झोपले होते. चोरट्यांनी खोलीला बाहेरून कडी लावली. मात्र, आवाजामुळे गोरख उठला व त्याने खिडकीतून बाहेर येऊन घरातील पेटी घेऊन जाणार्या चोराला पाठीमागून पकडले. मात्र दुसर्या चोरट्याने गोरखच्या पाठीवर धारदार शस्त्राने चार ते पाच वार केले़ झाडे कुटुंबियांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. शेजारच्या वस्तीवरील लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गोरखला खासगी रुग्णालयात दाखल केले. पाथर्डीला नेत असतानाच त्याचा रस्त्यात मृत्यू झाला.सकाळी मिरी ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी रास्ता रोको केला. आरोपींना दोन दिवसांत अटक करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (प्रतिनिधी)