Join us

दोन सत्रांमधील घसरणीनंतर सोन्या-चांदीच्या भावात सुधारणा

By admin | Updated: April 2, 2015 06:10 IST

दोन सत्रांच्या घसरणीनंतर बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात सुधारणा झाली. सोने २00 रुपयांनी वाढून २६,७७५ रुपये तोळा झाले, त

नवी दिल्ली : दोन सत्रांच्या घसरणीनंतर बुधवारी सोन्या-चांदीच्या भावात सुधारणा झाली. सोने २00 रुपयांनी वाढून २६,७७५ रुपये तोळा झाले, तर चांदी १५0 रुपयांनी वाढून ३७,५0 रुपये किलो झाली. जागतिक पातळीवरील मजबुती आणि दागिने निर्माते तसेच किरकोळ विक्रेते यांनी केलेली खरेदी याचा लाभ सोन्याला मिळाला.सराफा बाजारातील सूत्रांनी सांगितले की, डॉलरची किंमत घसरल्याचा लाभही सोन्याला झाला. भारतातच नव्हे, तर जगातील सर्वच बाजारांत सोने-चांदी वाढले. भारतातील भाव ठरविणाऱ्या सिंगापूरच्या सोने बाजारात सोन्याचा भाव 0.५ टक्क्याने वाढून १,१८९.१५ डॉलर प्रतिऔंस झाला. केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या आयातीवरील शुल्कात मंगळवारी वाढ केली. त्याचाही परिणाम या धातूंच्या किमतीवर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तयार चांदीचा भाव १५0 रुपयांनी वाढून ३७,३५0 रुपये किलो झाला. त्याचबरोबर साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ९0 रुपयांनी वाढून ३७,२६0 रुपये झाला. सोन्याच्या शिक्क्यांचा भाव मात्र खरेदीसाठी ५६ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५७ हजार रुपये प्रतिशेकडा असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)