Join us  

बंदीनंतरही बनावट नोटांचा बँकांत भरणा, गुप्तचरांचा अहवाल, संशयास्पद व्यवहारही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:05 AM

नोटाबंदीनंतर देशातील बँकांत बनावट नोटा प्राप्त होण्याचा सार्वकालिक विक्रम झाला आहे. त्याचप्रमाणे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड होण्याचे प्रमाणही ४८0 टक्क्यांनी वाढले आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील बँकांत बनावट नोटा प्राप्त होण्याचा सार्वकालिक विक्रम झाला आहे. त्याचप्रमाणे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड होण्याचे प्रमाणही ४८0 टक्क्यांनी वाढले आहे. २0१६ मधील नोटाबंदीबाबत तयार करण्यात आलेल्या पहिल्याच अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.वित्तीय गुप्तचर शाखेने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका, तसेच वित्तीय संस्थांत २0१६-१७ मध्ये ४.७३ लाख संशयास्पदआर्थिक व्यवहारांची नोंद (एसटीआर) झाली.हे प्रमाण आधीच्या वर्षाच्या तुलनेत ४00 टक्के जास्त आहे. २0१६-१७ मध्ये बँका व अन्य वित्तीय संस्थांत बनावट नोटांच्या व्यवहारांची नोंद (सीसीआर) होण्याच्या घटना ३.२२ लाखांपेक्षा जास्त वाढल्या आहेत.या घटनांचा नोटाबंदीशी संबंध आहे,असे अहवालात म्हटले आहे. ८ नोव्हेंबर २0१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी नोटाबंदी जाहीर करून १ हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.लाखो गैरप्रकारअहवालात म्हटले आहे की, २0१५-१६ मध्ये बनावट नोटा खपविण्याचे ४.१0 लाख प्रकार नोंदले गेले होते.सन २0१६-१७ मध्ये ते ७.३३ लाख झाले. हाही नोटाबंदीचाच परिणाम आहे. याआधी सर्वाधिक बनावट नोटांचे व्यवहार २00८-0९ मध्ये उघड झाले होते.- सीसीआर हा व्यहारावर आधारित रिपोर्ट आहे. जेव्हा बनावट नोटा उघड होतात, तेव्हा त्याची नोंद केली जाते. वित्तीय गुप्तचर शाखेच्या मनी लाँड्रिंगविरोधी नियमांनुसार, खोट्या नोटा चलनात चालविण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची अधिकृतरीत्या नोंद करणे बँका तसेच वित्तीय संस्थांना बंधनकारक आहे.

टॅग्स :नोटाबंदी