Join us

जाहिरात बातमी आवश्यक बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा - उमेश जाधव

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST

बोरगाव वैराळे - शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भाजपा किसान आघाडीचे नेते उमेश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी बाळापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बोरगाव वैराळे - शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भाजपा किसान आघाडीचे नेते उमेश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी बाळापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
बाळापूर तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या बोरगाव वैराळे, सोनाळा, धामणा, अंदुरा, नया अंदुरा, कारंजा (रम), हाता, नागद, सागद, काजीखेड, स्वरुपखेड, हातरुण, शिंगोली, निंबा, निंबी, मोखा या गावांना सतत चार पाच वर्षांपासून पुर्णा, मोर्णा, पानखास या नद्यांना पूर येत असल्याने शेतकर्‍यांची शेकडो हेक्टर जमिनीवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासोबतच शेतातील सुपीक मातीचा थर या पुरामुळे खरवडून जाते. खरवडून गेलेल्या शेतीला पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतिएकराला २० हजार रुपये खर्च करावा लागतो. मात्र खरवडून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई शेतकर्‍यांना दोन वर्षापासून मिळाली नाही.
याचबरोबर पूरग्रस्त शेतीमध्ये व बोगस बियाण्यामुळे शेतकर्‍यांना खरिपाची दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला चढविला आहे. संकटग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासोबत जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्या, अशी मागणी भाजपा किसान आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य उमेश जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
-----------