Join us  

अ‍ॅडव्हान्स टॅक्ससंदर्भात उपचारापेक्षा काळजी बरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 1:09 AM

जर करदात्याचे आर्थिक वषार्तील प्राप्तिकर दायित्व हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर करदात्याला तो संपूर्ण कर वर्षाच्या शेवटी भरण्याऐवजी पूर्ण वर्षामध्ये विविध हप्त्यांद्वारे भरावा लागेल. पूर्ण वर्षामध्ये देय असलेल्या या करालाच ‘अ‍ॅडव्हान्स टॅक्स’ म्हणतात.

- सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, प्राप्तिकर विभाग हे करदात्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्ससंबंधी नोटीस जारी करत आहे. तर अ‍ॅडव्हान्स टॅक्सची मूलभूत संकल्पना काय आहे?कृष्ण : (काल्पनिक पात्र): अर्जुना, जर करदात्याचे आर्थिक वषार्तील प्राप्तिकर दायित्व हे १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर करदात्याला तो संपूर्ण कर वर्षाच्या शेवटी भरण्याऐवजी पूर्ण वर्षामध्ये विविध हप्त्यांद्वारे भरावा लागेल. पूर्ण वर्षामध्ये देय असलेल्या या करालाच ‘अ‍ॅडव्हान्स टॅक्स’ म्हणतात.अर्जुन : कृष्णा, अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा भरणा करण्यासाठी कोणकोणत्या देय तारखा आहेत?कृष्ण : अर्जुना, अ‍ॅडव्हान्स टॅक्स हा ४ टप्प्यामध्ये भरावा लागेल. जेवढा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरायचा आहे, त्याची १५ टक्क्यांपर्यंत रक्कम ही १५ जूनच्या आधी किंवा तोपर्यंत भरावी लागेल. अ‍ॅडव्हान्स टॅक्सची ४५ टक्क्यांपर्यंत रक्कम ही १५ सप्टेंबरच्या आधी किंवा तोपर्यंत भरावी लागेल. नंतर अ‍ॅडव्हान्स टॅक्सची ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम ही १५ डिसेंबरच्या आधी किंवा तोपर्यंत भरावी लागेल आणि अ‍ॅडव्हान्स टॅक्सची संपूर्ण १०० टक्क्यांपर्यत रक्कम ही आर्थिक वर्षाच्या १५ मार्चपूर्वी किंवा तोपर्यंत भरावी.जर करदात्यांनी कलम ४४ एडी किंवा ४४ एडीए अंतर्गत प्रिझम्प्टीव्ह आधारावर उत्पन्न दाखविले असेल, तर त्यांना फक्त शेवटचा हप्ता भरावा लागेल. वरिष्ठ नागरिक ज्यांना व्यवसायातून काही उत्पन्न नाही, त्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्यातून सूट दिलेली आहे. पगारदार व्यक्तींसाठी नियोक्त्याद्वारेच टीडीएस केला जाईल.अर्जुन : कृष्णा, १५ मार्चच्या आधी प्राप्तिकरातील अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरावयाचा आहे. करदात्याने याबाबत काय दक्षता घ्यावी ?कृष्ण : अर्जुना, अगोदर आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी कम्पेरेटीव बॅलेन्सशिट आणि प्रॉफिट अँड लॉस अंकाउंट बनवून घ्यावे. त्यामुळे आर्थिक वर्षामध्ये होणारे अंदाजित उत्पन्न करदात्यास कळेल व त्यानुसार अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा शेवटाचा हप्ता भरणे सुलभ होईल.अर्जुन : कृष्णा, शेवटचा हप्ता भरण्याअगोदर म्हणजेच १५ मार्चपूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे ?कृष्ण : अर्जुना, करदात्याने चालू वर्षाचा अंदाजित नफा काढून त्या नख्यावर किती प्राप्तिकर भरावा लागेल ते काढावे. फॉर्म २६ ए एस नुसार प्राप्तिकरातून टीडीएस व आधी भरलेला अ‍ॅडव्हान्स टॅक्स वजा करावा व उरलेल्या रक्कमेचा कर भरावा.दुसरी सोपी पद्धत मागील वर्षी भरलेल्या प्राप्तिकरावर चालू वर्षाचा अंदाजित वाढ गृहीत धरून अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा. उदा- ढोबळमानाने मागील वर्षी १ लाख रुपये प्राप्तिकर भरल्यास चालू वर्षी व्यापाºयाची अंदाजित वाढ २० टक्के गृहीत धरल्यास चालू वर्षीच्या एकूण प्राप्तिकर १ लाख २० हजार रुपये होईल व त्यानुसार अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा भरणा करावा. प्रत्येक व्यापाºयाने आपापल्या व्यापाराची वाढ/घट लक्षात घेऊनच अ‍ॅडव्हान्स टॅक्सचे हप्ते भरावे.अर्जुन : कृष्णा, अ‍ॅडव्हान्स टॅक्स कमी जास्त भरला गेला, तर काय होईल?कृष्ण : अर्जुना, जसे जास्तीचे सत्कर्म केलेले केव्हाही कामी येतात, तसेच जास्तीचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरल्यास तो वाया जात नाही. इनकम टॅक्स डिपार्टमेंट आपले रिटर्न तपासून जास्तीच्या भरलेल्या टॅक्सचे व्याजासोबत परतफेड करते. करदात्याने कमी कर भरल्यास जास्तीचा व्याज व इनकम टॅक्स नोटिसांना सामोरे जावे लागते.अर्जुन : कृष्णा, अ‍ॅडव्हान्स टॅक्स न भरल्यास काय होईल?कृष्ण : अर्जुना, अ‍ॅडव्हान्स टॅक्स न भरल्यास प्रतीमहिना १ टक्के दराप्रमाणे व्याज भरावा लागेल, तसेच चौकशीलाही सामोरे जावे लागेल, तसेच मोठ्या रकमेचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स चुकविणाºयांवर दडांत्मक कारवाई होऊ शकते. संगणकीकरण झाल्याने प्राप्तिकर विभागाला बरीचशी माहिती मिळते, त्या आधारे ते अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या नोटीस पाठवून कर भरावयाला लाऊ शकतात.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, प्राप्तिकरात मागील वर्षीचा नफा तोटा पाहून पुढील वर्षाचे निर्णय घ्यावे लागतात. चालू वर्षीच्या उत्पन्नानुसार अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावे लागते व भविष्यातील वाढ लक्षात घेऊन अ‍ॅडव्हान्स टॅक्स किती भरावा हे सुध्दा ठरवावे लागते. म्हणून कायद्याच्या तरतूदीचे पालन करूनच कर भरावा, नाहीतर करदात्याला भविष्यात येणाºया अडचणींना सामोरे जावे लागेल. नंतर उपचार करण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी.

टॅग्स :इन्कम टॅक्सकर