Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील कारखान्यांना १४१ कोटींचा बोनस

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

* एकूण उसाचे क्षेत्र १ लाख ४६ हजार २९५ हेक्टर

* एकूण उसाचे क्षेत्र १ लाख ४६ हजार २९५ हेक्टर
* उसाची उपलब्धता १ कोटी ३८ लाख ९८ मे. टन
* पाच टक्के कराची ऊस उत्पादकांना दिलेल्या दरावर ऊसखरेदी कर म्हणून सूट
कोपार्डे (प्रकाश पाटील) : राज्यशासनाने अपारंपरिक उर्जा निर्मितीचे नवीन धोरण म्हणून सप्टंेबर २००८ मध्ये जे साखर कारखाने सहवीज निर्मिती प्रकल्प रबावितील अशा साखर कारखान्यांना दहा वर्षे ऊस खरेदी करात सूट केली होती. मात्र साखरेचे घटलेले दर व ऊस खरेदी दरात झालेली भरमसाठ वाढ यामुळे साखर कारखाने आर्थिक अडचणीत आलेल्या राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना ऊसखरेदी करात सूट दिल्याने कोल्हापूर जिल्‘ातील २० कारखान्यांना १४१ कोटींचा बोनस मिळाला आहे.
सध्या बाजारात साखरेच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. साखरेचे दर प्रति क्विंटल २५०० ते २६०० रुपयांवर पोहोचल्याने किमान एफआरपी कशीद्यावयाची या आर्थिक कोंडित कारखानदार होते. एवढी रक्कम देण्यासाठी शासनाने प्रतिटन अनुदान द्यावे अथवा विविध करातून शासनाला द्याव्या लागणार्‍या करातून सुटका करावी, अशी मागणी कारखानदारांकडून हंगाम सुरू झाल्यापासून होत होती.
सध्या शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी संघर्षाची धार कमी केली असली तरी येत्या काळात किमान एफआरपीसाठी तरी संघटनांनी नाही लावला तरी शासन तगादा लावणार व एकरकमी एफआरपी देता येणे शक्य नसल्याने व ती न दिल्यास कारखानदारांवर कायदेशीर कारवाईचे संकेत खुद्द राज्याचे मुख्य सचिव व ऊसदर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष क्षत्रीय स्वाधीन यांनी दिल्याने कारखानदारात असंतोष होता.
यासाठीच भाजप सरकारने ऊस खरेदी करात सूट देऊन कारखानदारांना दिलासा दिला आहे.
------------------
चौकट :
काय आहे ऊस खरेदी कर
कारखानदारांनी ऊस तोडून गाळपासाठी आणलेले नंतर त्यासाठी द्याव्या लागणार्‍या दरावर पाच टक्के प्रमाणे खरेदी दर लावला जातो. कोल्हापूर जिल्‘ाचा साखर उतारा चांगला असल्याने किमान २४०० ते २५०० रुपये ऊस खरेदीवर कारखानदारांचे प्रतिटन द्यावे लागणार आहे व त्यावर प्रतिटन ऊस खरेदी कर लावला जातो.
-----------------
सहवीज प्रकल्प असणार्‍या कारखानदारांचे काय?
प्रत्यक्षात २००५ मध्ये ऊस खरेदी माफ करताना ज्या कारखान्यांनी सहवीज प्रकल्प सुरू केले आहेत. त्यांनाच हा ऊस खरेदीकर माफ होत होता. मात्र मागील वर्षी ऊस खरेदी कर माफ सर्वच कारखान्यांना केल्यानंतर सहवीज प्रकल्प असणार्‍यांनी ओरड केल्यानंतर त्यांना १० वर्षाऐवजी ११ वर्षे ऊस खरेदीकर मा फ केला होता. याहीवर्षी सर्वच कारखान्यांना ऊस खरेदी माफ केल्याने सहवीज प्रकल्प असणार्‍या कारखान्यांचे आणखी एक वर्षे वाढवून ते १२ वर्षांपर्यंत करणार काय? याबाबत सहवीज प्रकल्पधारक कारखानदारांचे लक्ष लागले आहे.
---------------------
जिल्‘ातील साखर कारखान्यांना ऊस खरेदी करातून किती रक्कम बोनस मिळणार याची आकडेवारी (एफआरपीनुसार ऊस खरेदी धरून अंदाजे किती लाभ होणार याचा सारांश)
कारखान्याचे नावहंगाम २०१४-१५ मध्ये उपलब्ध ऊस (लाख मे. टन)एफआरपीप्रमाणे खरेदी दर धरून अंदाजे पाच टक्के प्रमाणे माफ होणार्‍या ऊस खरेदीकरची रक्क कोटी रुपयांत
* कुंभी कासारी (कुडित्रे)५ लाख ७८ हजार७ कोटी ५१ लाख
* भोगावती (परिते)६ लाख ८ हजार८ कोटी ८४ लाख
* शाहू (कागल)७ लाख ३३ हजार९ कोटी ३४ लाख
* राजाराम (बावडा)४ लाख १६ हजार४ कोटी ९९ हजार
* दत्त (शिरोळ)८ लाख ७५ हजार१० कोटी ९३ लाख
* दूधगंगा-वेदगंगा (बिद्री)७ लाख ६९ हजार१० कोटी १८ लाख
* गडहिंग्लज (हरळी)३ लाख ४ हजार३ कोटी ६४ लाख
* जवाहर (हुपरी)९ लाख ११ हजार११ कोटी ३८ लाख
* मंडलिक, हमीदवाडा५ लाख ३६ हजार७ कोटी १० लाख
* पंचगंगा (इचलकरंजी)५ लाख ८४ हजार७ कोटी ३० लाख
* शरद (शिरोळ)४ लाख ९२ हजार६ कोटी २७ लाख
* वारणा१४ लाख ९ हजार१७ कोटी ८८ लाख
* डी. वाय. पाटील (पळसंबे)४ लाख ६४ हजार६ कोटी ३ लाख
* दालमिया (आसुर्ले)४ लाख ६४ हजार६ कोटी ३ लाख
* गुरूदत्त (टाकळी)४ लाख ७६ हजार६ कोटी ६९ लाख
* उदय (बांबडे)२ लाख ९२ हजार३ कोटी ५० लाख
* आजरा४ लाख २५ हजार५ कोटी ३१ लाख
* इको चंदगड२ लाख ८८ हजार२ कोटी ६१ लाख
* हेमरस५ लाख ४ हजार६ कोटी ५५ लाख