एक्साईडमधील १४ कामगार कायम स्वराज संघटना: कामगारांना व्यवस्थापनाकडून नियुक्तीचे पत्र
By admin | Updated: July 11, 2014 21:45 IST
अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक्साईड बॅटरी कंपनीत कार्यरत असलेल्या १४ कामगारांना कायम करण्यात आले असून, कामगारांना कंपनीचे दिल्ली येथील प्रतिनिधी कुशल बॅनर्जी यांच्याहस्ते शुक्रवारी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे़
एक्साईडमधील १४ कामगार कायम स्वराज संघटना: कामगारांना व्यवस्थापनाकडून नियुक्तीचे पत्र
अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक्साईड बॅटरी कंपनीत कार्यरत असलेल्या १४ कामगारांना कायम करण्यात आले असून, कामगारांना कंपनीचे दिल्ली येथील प्रतिनिधी कुशल बॅनर्जी यांच्याहस्ते शुक्रवारी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे़स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना कायम करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली होती़ या मागणीची दखल घेऊन कंपनी व्यवस्थापनाने पहिल्या टप्प्यात १४ कामगारांना कायम सेवेत घेतले असून, तसे नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले आहे़यावेळी कंपनीचे सुब्रा सिन्हा, शरद देशपांडे, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे,उपाध्यक्ष किरण दाभाडे, दत्ता तपकिरे, सुनील कदम,ॲड़ सुधीर टोकेकर, ॲड़ अंकुश गर्जे, बाबासाहेब गायकवाड, अजय पोटे, रामदास उकांडे उपस्थित होते़कायम सेवेत घेतलेल्या कामगारांनी चांगले काम करावे़ चांगले काम केल्यास कंपनीच्या उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढेल़ परिणामी कामगारांचेही अर्थिक उत्पन्न वाढवून सुधारणा होईल़ कंपनी व्यवस्थापन व कामगारांत चांगले संबंध ठेवण्यासाठी संघटनांनी काम करावे, असे सिन्हा यावेळी म्हणाले़ कामगारांना कायम केल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष गलांडे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले़