lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Kisan निधीची प्रतीक्षा संपली! आता 'या' तारखेला मिळणार 2000 रुपये, कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

PM Kisan निधीची प्रतीक्षा संपली! आता 'या' तारखेला मिळणार 2000 रुपये, कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

PM Kisan Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान येणार आहेत. ज्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:55 PM2022-05-19T14:55:43+5:302022-05-19T14:56:16+5:30

PM Kisan Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान येणार आहेत. ज्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. 

narendra singh tomar tells pm kisan 11th installment date pm modi | PM Kisan निधीची प्रतीक्षा संपली! आता 'या' तारखेला मिळणार 2000 रुपये, कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

PM Kisan निधीची प्रतीक्षा संपली! आता 'या' तारखेला मिळणार 2000 रुपये, कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 11 व्या हप्त्याची (PM Kisan 11th Installment) प्रतीक्षा करणाऱ्या देशभरातील 12.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. शेतकऱ्यांना लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते 11 वा हप्ता कधी जारी होणार आहे? याबाबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान येणार आहेत. ज्याची शेतकरी अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. 

कृषी मंत्री नरेंद्र सिंह यांनी 11वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्याच्या तारखेबद्दल सांगितले आहे. मध्य प्रदेशमध्ये आयोजित कृषी कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात त्यांचा व्हर्चुअली सहभाग होता. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी 'किसान सन्मान निधी कार्यक्रम' जाहीर केला होता. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये दिले जातात.

याचबरोबर, किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी पुन्हा देणार असल्याचेही कृषी मंत्री नरेंद्र सिंह यांनी सांगितले. दरम्यान, 2021 मध्ये 15 मे रोजी सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. यंदा 15 मे नंतर सुद्धा 11 वा हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे लाभार्थी शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. केंद्रीय मंत्र्यांनी तारीख जाहीर केल्यानंतर प्रतीक्षा आणखी वाढणार आहे.

e-KYC करणे आवश्यक
दरम्यान, यावेळी 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी  (e-KYC) करणे आवश्यक आहे. साडे बारा कोटींपैकी जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही घरी बसून पीएम किसानच्या वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसी पूर्ण करू शकता.

Web Title: narendra singh tomar tells pm kisan 11th installment date pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.