Lokmat Money >म्युच्युअल फंड > Zerodha Nitin Kamath : ‘पैशांच्या मागे पळू नका, इकडे गुंतवणूक करा,’ नितीन कामत यांनी तरूणांना दिल्या टीप्स

Zerodha Nitin Kamath : ‘पैशांच्या मागे पळू नका, इकडे गुंतवणूक करा,’ नितीन कामत यांनी तरूणांना दिल्या टीप्स

Zerodha Nitin Kamath : गुंतवणूक कशी करावी आणि कसा नफा मिळवावा या बद्दल त्यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:09 PM2022-11-14T16:09:32+5:302022-11-14T16:10:04+5:30

Zerodha Nitin Kamath : गुंतवणूक कशी करावी आणि कसा नफा मिळवावा या बद्दल त्यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

Zerodha Nitin Kamath Don't run after money invest in youself skills broking firm zerodha Nitin Kamath gave tips to the youth | Zerodha Nitin Kamath : ‘पैशांच्या मागे पळू नका, इकडे गुंतवणूक करा,’ नितीन कामत यांनी तरूणांना दिल्या टीप्स

Zerodha Nitin Kamath : ‘पैशांच्या मागे पळू नका, इकडे गुंतवणूक करा,’ नितीन कामत यांनी तरूणांना दिल्या टीप्स

Zerodha Nitin Kamath : गुंतवल्यावर पैसा वाढतो, पण त्यासाठी तुमच्याकडे संयम असणं आवश्यक आहे. झिरोदाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामत यांनी तरुणांना काही टीप्स दिल्या आहेत. मी २१ वर्षांचा होतो तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला आणि त्या धक्क्यातून तसंच मी घेतलेल्या कर्जातून सावरण्याचा प्रयत्न केला. यातून आपल्याला जीवनाचे अनेक धडे मिळाल्याचे कामत म्हणाले. याशिवाय आपण मारवाडी समाजातील काही लोकांच्या सोबत राहून ट्रेडिंगची माहिती घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. "मी लहान असताना माझे वडील बँकेत काम करत होते आणि त्या काळातील सर्व लोकप्रिय IPO मध्ये गुंतवणूक केली होती,” अशी माहितीही कामत यांनी दिली.

जरी ते सक्रिय गुंतवणूकदार नसले तरी ते घरी आपल्या गुंतवणूकीबाबत चर्चा करत होते. घरी होत असलेल्या या चर्चेने गुंतवणूक आणि ट्रेडिंगच्या प्रवासासाठी प्रेरणा दिल्याचं भारतातील सर्वात मोठं स्टॉक ब्रोकिंग हाऊस झिरोदाचे संस्थापक नितीन कामत यांनी सांगितलं. कामत यांनी १७ व्या वर्षीच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली आणि २१ व्या वर्षापर्यंत मोठी रक्कम जमाही केली होती. हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्रॅश (Y2K) होण्यापूर्वीचे होते आणि त्याने त्यांचं सर्व भांडवल गमावलं. मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या तुलनेत मी लागलेल्या झटक्यांमुळे अधिक शिकलो असंही त्यांनी स्पष्ट केलं. इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अभ्यासाच्या वेळी अभ्यास करणं आणि नवी स्किल मिळवण्यासाठी गुंतवणूक करणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. मनी कंट्रोलशी बोलताना कामत यांनी तरुणांना काही टीप्सही दिल्या आहेत.

गुंतवणूक करा आणि सवय बनवा
तरुण वयात तरुणपणाचा आनंद घेणं महत्त्वाचं आहे. परंतु पॉकेटमनीतील छोट्या भागांमधून गुंतवणूकीची सवय लावून घेणंही महत्त्वाचं आहे. सुरूवातीच्या काळात केवळ सेव्हिंग आणि गुंतवणूकीलाच सवय बनवणं हेच ध्येय असावं असं त्यांनी सांगितलं.

अनुभवात गुंतवणूक करा
जर तुम्हाला बास्केटबॉल आवडत असेल तर त्याचं तिकिट खरेदी करा आणि ते पाहा. कोणत्याही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेलल्या विद्यार्थ्यानं पॉकेटमनीचा वापर आयफोन खरेदी करु नये. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ सुधारत नाही.

इंडेक्स फंडात गुंतवणूक
म्युच्युअल फंडामध्ये अल्प प्रमाणात गुंतवणूक करणे हा आर्थिक शिस्त विकसित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. वृत्तपत्रांचा मागोवा घेऊन इंडेक्स फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला बाजाराचे स्वरूप समजण्यास मदत होईल.

कर्ज घेऊन करू नका
वेगवेगळ्या गोष्टी करून पाहणे आणि प्रयोग करणे महत्त्वाचे असले, तरी हे कर्ज घेऊन करू नये, हेही समजून घेणे आवश्यक आहे.

स्किल्स विकसित कर
उत्सुकता हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे जे एखाद्याला कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी विकसित करणे आवश्यक आहे.

मला माझ्या सहा वर्षांच्या मुलाला हेच सांगायचे आहे. अनेक लोक पैशावर जास्त भर देऊन याला मोठी चूक करतात. केवळ इक्विटी आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा आग्रह धरू नका. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. कौशल्य विकासावर भर द्या, असंही कामत म्हणाले.

Web Title: Zerodha Nitin Kamath Don't run after money invest in youself skills broking firm zerodha Nitin Kamath gave tips to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.