Lokmat Money >म्युच्युअल फंड > संपत्ती झाली तब्बल ४० लाख काेटींची; गुंतवणूकदारांना केले मालामाल, म्युच्युअल फंडवर जनतेचा विश्वास

संपत्ती झाली तब्बल ४० लाख काेटींची; गुंतवणूकदारांना केले मालामाल, म्युच्युअल फंडवर जनतेचा विश्वास

असाेसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:26 AM2022-12-13T10:26:45+5:302022-12-13T10:27:30+5:30

असाेसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

The wealth became as much as 40 lakh crores; Investors benefited, public trust in mutual funds | संपत्ती झाली तब्बल ४० लाख काेटींची; गुंतवणूकदारांना केले मालामाल, म्युच्युअल फंडवर जनतेचा विश्वास

संपत्ती झाली तब्बल ४० लाख काेटींची; गुंतवणूकदारांना केले मालामाल, म्युच्युअल फंडवर जनतेचा विश्वास

दीर्घकालीन गुंतवणूक करून श्रीमंत हाेण्याचा एक विश्वासू पर्याय म्हणून म्युच्युअल फंडकडे पाहिले जाते. गुंतवणूकदारांचा यावरील विश्वास सातत्याने वाढत आहे. यात झालेल्या गुंतवणुकीचा आकडाच हे सांगताे. म्युच्युअल फंडमध्ये आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीचा आकडा तब्बल ४० लाख कोटी रुपयांवर पाेहाेचला आहे. नाेव्हेंबर महिन्यात प्रथमच हा टप्पा पार झाला. असाेसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

४०.३७ 
लाख काेटी रुपये म्युच्युअल फंडचे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट
२०२१  
मध्ये सर्वाधिक ८.४५ लाख काेटी रुपयांनी गुंतवणूक वाढली.
७६%  
घट इक्विटी फंडमध्ये गेल्या महिन्यात झाली.
९,३९०काेटी 
गुंतवणूकदारांनी काढले


दुहेरी फायद्यामुळे लाेकांचा ओढा
दुहेरी फायद्यामुळे लाेकांचा ओढा म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सर्वसामान्यांसाठी सुरक्षित मानली जाते. अगदी दरमहा १०० रुपयांपासून त्यात गुंतवणूक करता येते. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे गुंतवणूक दीर्घकालीन फायदा देते. या गुंतवणुकीवर कर सवलत दिल्यामुळे लाेकांचा ओढा याकडे वाढला. चांगला परतावा व करबचत, असे फायदे मिळत असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

एसआयपीला पसंती
नाेव्हेंबर महिन्यात एसआयपीद्वारे हाेणाऱ्या गुंतवणुकीनेही उच्चांक गाठला. तब्बल १३,३०७ काेटी रुपयांची गुंतवणूक झाली. ऑक्टोबरमध्ये प्रथमच हा आकडा १३ हजार काेटींवर गेला हाेता.

Web Title: The wealth became as much as 40 lakh crores; Investors benefited, public trust in mutual funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.