Lokmat Money >म्युच्युअल फंड > Investment Tips : रोज वाचवा केवळ १०० ₹; १५ वर्षांत जमा होतील २० लाख, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक

Investment Tips : रोज वाचवा केवळ १०० ₹; १५ वर्षांत जमा होतील २० लाख, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक

सध्या बँकेच्या बचत योजना फारशा आकर्षक राहिलेल्या नाहीत. दरम्यान, मोठं सेव्हिंग असणं ही काळाची गरजही बनत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 02:25 PM2022-11-23T14:25:24+5:302022-11-23T14:25:45+5:30

सध्या बँकेच्या बचत योजना फारशा आकर्षक राहिलेल्या नाहीत. दरम्यान, मोठं सेव्हिंग असणं ही काळाची गरजही बनत चालली आहे.

Investment Tips Save only 100 rs daily 20 lakhs accumulated in 15 years see details mutual fund investment market risk sip | Investment Tips : रोज वाचवा केवळ १०० ₹; १५ वर्षांत जमा होतील २० लाख, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक

Investment Tips : रोज वाचवा केवळ १०० ₹; १५ वर्षांत जमा होतील २० लाख, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक

सध्या व्याजदरात (Interest Rate) सातत्यानं वाढ होत आहे. तरीही, बँकांचे बचत खाते (Saving Bank Account) आणि मुदत ठेव खाते (Recurring Account), एफडी (Fixed Deposit) वर मिळणारे व्याज कमी आहे. त्यापेक्षा महागाईचा दर जास्त आहे. त्यामुळे बँक बचत योजना फारशा आकर्षक राहिलेल्या नाहीत.

पर्सनल फायनान्समधील तज्ज्ञ आणि बजाज कॅपिटलचे माजी सीएमओ विश्वजित पराशर म्हणतात की अशा परिस्थितीत, जर तुम्हाला कमी पैशात जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता.

असा बनेल मोठा फंड
आजकाल रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, पण महागाईनुसार वेतन वाढलेले नाही. त्यामुळे सर्वांच्या बचतीवर परिणाम झाला आहे. अशा वातावरणात तुम्ही दिवसाला 100 रुपये वाचवलेत तर ते महिन्याला 3,000 रुपये होईल. तुम्ही हे रुपये 3,000 दरमहा एका चांगल्या म्युच्युअल फंड योजनेच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये टाकू शकता. तुम्हाला ही गुंतवणूक सलग 15 वर्षे करावी लागेल. सध्या बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 15 वर्षांत दरवर्षी 15 टक्के दराने परतावा दिला आहे. जर तुम्हाला इतका परतावा मिळत राहिला तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 20 लाख रुपयांचा निधी जमा झाला असेल.

अशा प्रकारे वाढेल रक्कम
तुम्ही म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये (Mutual Fund Scheme) दरमहा 3 हजार रुपये गुंतवता आणि ही गुंतवणूक 15 वर्षे सतत सुरू राहिल्यास तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. 15 वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये होईल. जर तुमच्या फंड मॅनेजरची कामगिरी चांगली असेल, तर 15 वर्षांनंतर तुमच्या एसआयपीचे एकूण मूल्य 20 लाख रुपये होईल. म्हणजे 14.60 लाख रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल.

गुंतवणूकीसाठी एसआयपी उत्तम
कोणत्याही सामान्य गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी. अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने एव्हरेजिंग होतं, ज्यामुळे तोटा होण्याचा धोका कमी होतो. असे झाल्यावर चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यताही वाढते. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार सुरू आहे. परंतु यात ज्या दिवशी बाजारात वाढ होते तेव्हाही पैसे गुंतवले जातात आणि जेव्हा बाजार पडतो तेव्हाही गुंतवले जातात.

अनेक फंडांची उत्तम कामगिरी
म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, काही चांगल्या योजनांनी 15 वर्षांमध्ये 15 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यामध्ये अनेक फंडांची नावे येतात. पण, गुंतवणूकदारांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही कोणत्याही फंडाचे नाव देत नाही. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गुंतवणूकदारांनी त्यांचा संपूर्ण निधी कोणत्याही एका फंडात ठेवू नये. तुम्ही दरमहा 3,000 रुपये गुंतवत असाल, तर प्रत्येकी 1,000 रुपयांचे तीन भाग करा आणि तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये गुंतवणूक करा.

(टीप - या लेखात केवळ गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Investment Tips Save only 100 rs daily 20 lakhs accumulated in 15 years see details mutual fund investment market risk sip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.