Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू

टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणेनंतर दिग्गज कंपन्या एकत्र येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 03:32 PM2021-02-03T15:32:50+5:302021-02-03T15:33:55+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मोठ्या घोषणेनंतर दिग्गज कंपन्या एकत्र येण्याची शक्यता

Mukesh Ambani Ratan Tata and Anand Mahindra likely come together for Indias new National Hydrogen Mission | टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू

टाटा, महिंद्रा, अंबानी एकत्र येणार? देशाला 'नवी ऊर्जा' देऊन इतिहास घडवण्याची तयारी सुरू

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये हायड्रोजन एनर्जी मिशनचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी या योजनेची सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या माध्यमातून हरित स्रोताचा वापर करून हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो. या योजनेला आता अर्थमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.

पाहा केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ आणि काय फायदा होणार पॉलिसी धारकांना

हायड्रोजन एनर्जी मिशनसाठी देशातले दिग्गज उद्योगपती एकत्र येण्याची शक्यता आहे. यामध्ये टाटा, अंबानी, महिंद्रा यांचा समावेश आहे. याशिवाय इंडियन ऑईल, आयशरसारख्या कंपन्या या प्रकल्पात मोठी भागिदारी असू शकतात. हायड्रोजन एनर्जी मिशनसाठी प्रचंड मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. त्यामुळेच या मिशनवर अनेक मोठ्या कंपन्या काम करतील. या मिशनमुळे ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील. याचा परिणाम थेट खनिज तेलाच्या आयातीवर होणार असल्यानं याचा लाभ देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकेल.

तुम्हीही आहात का HDFC बँक ग्राहक?; रात्रीपासून डेबिट कार्ड वापरता येणार नाही

हायड्रोजन एनर्जी मिशनचा उद्देश काय?
हायड्रोजन वायू विविध मार्गांनी तयार करता येतो. पण हायड्रोजन एनर्जी मिशनच्या अंतर्गत या वायूची निर्मिती हरित स्रोतांचा वापर करून केली जाईल. जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश यामागे आहे. याशिवाय प्रदूषण कमी करण्याचाही सरकारचा विचार आहे. भारत जवळपास ८० टक्के खनिज तेल आयात करतो. यामुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील अवलंबित्व दूर करून त्याऐवजी हायड्रोजन वायूचा पर्याय वापरण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

भारत इंधन निर्मितीच्या नव्या मैदानात
हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या देशांच्या शर्यतीत आधी भारताचा समावेश नव्हता. मात्र अर्थमंत्री सीतारामन यांच्या घोषणेमुळे आता भारत इंधन निर्मितीच्या नव्या मैदानात उतरला आहे. हायड्रोजन ऊर्जेचं तंत्रज्ञान अद्याप व्यवसायिकदृष्ट्या सफल झालेलं नाही. अनेकांनी आतापर्यंत या दिशेनं फारसा विचारदेखील केलेला नव्हता. मात्र आता या तंत्रज्ञानाकडे व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं पाहिलं जाऊ लागलं आहे. हायड्रोजन वायूच्या वापरातून प्रदूषण होत नाही. त्यामुळे जगाचं लक्ष याकडे लागलं आहे. 

Web Title: Mukesh Ambani Ratan Tata and Anand Mahindra likely come together for Indias new National Hydrogen Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.