Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'अंदर की बात'... देशातील १० पैकी ९ कंपन्यांना रिक्त जागांसाठी हवा आहे 'आतला माणूस'

'अंदर की बात'... देशातील १० पैकी ९ कंपन्यांना रिक्त जागांसाठी हवा आहे 'आतला माणूस'

नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIN नं केलं ५०० कंपन्यांमध्ये सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 06:39 PM2021-04-14T18:39:56+5:302021-04-14T19:33:59+5:30

नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIN नं केलं ५०० कंपन्यांमध्ये सर्वेक्षण

Most Indian companies look to fill open roles internally says LinkedIn in report coronavirus | 'अंदर की बात'... देशातील १० पैकी ९ कंपन्यांना रिक्त जागांसाठी हवा आहे 'आतला माणूस'

'अंदर की बात'... देशातील १० पैकी ९ कंपन्यांना रिक्त जागांसाठी हवा आहे 'आतला माणूस'

Highlightsनेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIN नं केलं ५०० कंपन्यांमध्ये सर्वेक्षण२०२१ मध्ये अधिक कंपन्या होतील मर्ज, रुची आनंद यांचं मत

लिंक्डइन (LinkedIn) फ्यूचर ऑफ टॅलेंटनं (Future of Talent) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये त्यांनी ५०० कंपन्यांचं सर्वेक्षण करून कंपन्या सद्यस्थितीत कशाप्रकारे कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्याच्या विचारात आहेत याबाबत खुलासा केला आहे. कोरोना महासाथीच्या काळात कंपन्यांमध्ये मोठ्या बदलांची सुरूवात झाली आहे. यादरम्यान १० पैकी ९ कंपन्या कंपनीच्या आतूनच ज्या शिफारसी येतात, त्यांच्यापैकीच कोणाची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत, असं या अहवालातून सांगण्यात आलं आहे. 

 LinkedIn नं तब्बल ५०० कंपन्यांचं सर्वेक्षण केलं. यामध्ये HR मॅनेजमेंटनं सहमती दर्शवली की आता संस्थांना अधिक कार्यक्षम बनवणं आणि कोरोनाच्या दरम्यान अधिक कुशलतेनं काम करणाऱ्यांना हायर करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. २०२० मध्ये कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा दर हा १.५ टक्क्यांनी वाढला. कारण बाहेरून काम करण्याच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना मोठ्या शिफ्टमध्ये काम करावं लागलं. भविष्यातील कलागुण निश्चित करण्यासाठी एचआर मोठी भूमिका बजावेल, असंही अहवलात नमूद करण्यात आलं आहे. 

अहवालानुसार, प्रतिस्पर्धात्मक धोरणासाठी अपस्किलिंग सर्वात महत्वाच असेल. इंटरनल मोबिलिटी आणि डेटा यासारख्या ट्रेंडच्या आधारे हायरिंगवर निर्णय घेतले जातील. तसंच, २०२१ मध्ये कंपन्यांचे लक्ष्य कर्मचार्‍यांच्या अनुभवांमध्ये सुधारणा करण्यावरच असेल.

२०२१ मध्ये अधिक कंपन्या होतील मर्ज

"२०२१ मध्ये भारतात अधिक कंपन्या मर्ज होतील. आपल्या कर्मचाऱ्यांना त्या पुढे नेतील आणि ऑपरेशनल कॉस्ट न वाढवताच बिझनेस ग्रोथ वाढवण्यासाठी अंतर्गत पद्धतीनं हायरिंग केलं जाईल. डेटा लिडींग हायरिंग प्रॅक्टिसही कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत जोडणं, योग्य कलागुणांना आकर्षित करणं आणि २०२१ मध्ये अधिक प्रभावीपणे हायरिंग करण्यात मोलाची भूमिका बजावतील," असं मत टॅलेंटड अँड लर्निंग सोल्युशन्स, लिंक्डइन इंडियाच्या अध्यक्षा  म्हणाल्या. 

अंतर्गत स्तरावरील दृष्टीकोन किंवा प्रगतीची भावना वाढवण्यासाठी भारतातील १० पैकी सात कंपन्या अंतर्गत शिफारशींच्या आधारे हायरिंग करतात. असं  करताना भारतातील कंपन्या महत्त्वाची तीन कौशल्ये पाहतात. ती म्हणजे चांगलं कम्य़ुनिकेशन, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि वेळेचं व्यवस्थापन या आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की आजच्या वेगवान डिजिटलायझेशनच्या गरजेनुसार काम करण्यासाठी कंपन्या त्यांच्या कर्मचार्‍यांची क्षमता वाढवण्यासही उत्सुक आहेत. तसंत ९५ टक्के कंपन्या कर्मचार्‍यांना नवीन कौशल्ये शिकण्यास आणि भविष्यातील तयारीच्या मदतीसाठी डेव्हलप केलेल्या विकासाच्या कार्यक्रमास समर्थन देतात, असंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. रिमोट हायरिंग अधिक कार्यक्षम करण्यासाठी आज १० पैकी ९ कंपन्या टॅलेंट कॉस्ट कमी करण्यासाठी अनेक बाबी मर्ज करून एकाच पोस्टसाठी हायरिंग करतात असंही अहवालात म्हटलं आहे.

 

Web Title: Most Indian companies look to fill open roles internally says LinkedIn in report coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.