morgan stanley says global economy inching towards recession | जगभरात येत्या 9 महिन्यांत येणार मंदी; जाणून घ्या भारतावर काय होणार परिणाम
जगभरात येत्या 9 महिन्यांत येणार मंदी; जाणून घ्या भारतावर काय होणार परिणाम

नवी दिल्लीः अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनली (Morgan Stanley)नं पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदी येण्याचे संकेत दिले आहेत. मार्गन स्टेनली या बँकेच्या मते, जगभरातल्या अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे लवकरच जागतिक मंदी येण्याची चिन्हे आहेत. येत्या 9 महिन्यात ही मंदी येणार असल्याचीही शक्यताही मॉर्गन स्टेनली या बँकेनं वर्तवली आहे. भारतात मंदीची चिन्हे दिसत नसली तरी वाहन उद्योगासारखे क्षेत्र प्रचंड तोट्यात आहेत.  

जगभरातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था या मंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळेच मंदी येण्याचं प्रमुख कारण सांगितलं जातंय. जर अमेरिकेनं पुन्हा एकदा व्यापार युद्धाला तोंड फोडलं आणि चीनला आयात करणाऱ्या सर्वच वस्तूंवर 25 टक्के जास्त कर द्यावा लागल्यास जगभरात मंदीचे ढग दाटू शकतात. बाँड यील्डच्या ग्राफचं चक्र जेव्हा उलटं फिरू लागलं होतं, तेव्हाही 2008मध्ये आर्थिक संकट ओढावलं होतं. परंतु भारतात मंदी येण्याचं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. फक्त वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात खतरनाक मंदी आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या तीन महिन्यांमध्ये घसरण झाली असून, देशाचा विकासही मंदावला आहे. औद्योगिक उत्पादन आणि कोअर इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे. 

युरोपीय देशांनाही मंदीचा धोका
ब्रिटनची अर्थव्यवस्था आणि इतर युरोपीय अर्थव्यवस्थांना मंदीचा मोठा धोका असल्याचं समोर आलं आहे. ब्रेक्झिटच्या कारणास्तवर राजकीय अनिश्चिततेमुळे तिथलं दुसऱ्या तिमाहीतील घरगुती उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे मंदीची चिन्हे दाटली आहेत. जागतिक मंदी येणार असल्यानं जागतिक बँकेनंही आतापासून उपाययोजनांची सुरुवात केली आहे.  


Web Title: morgan stanley says global economy inching towards recession
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.