Lokmat Money > बिझनेस न्यूज > भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत?

भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत?

भारतीय कंपनीकडे या करारासाठी दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरा पर्याय म्हणजे गूगल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 04:54 PM2020-06-09T16:54:51+5:302020-06-09T16:59:20+5:30

भारतीय कंपनीकडे या करारासाठी दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरा पर्याय म्हणजे गूगल.

microsoft or google may have final deal with jio with buy 6 percent stake | भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत?

भागीदारीची लढाई!: मायक्रोसॉफ्ट की गूगल, भारताच्या या दिग्गज कंपनीचा मोठा हिस्सा कोण घेणार विकत?

Highlightsजिओची भागीदारी विकत घेण्याची या दोघांचीही इच्छा आहे.गूगल जिओची स्पर्धक कंपनी व्होडाफोन-आयडियासोबतही 5 टक्के भागीदारी विकत घेण्यासंदर्भात बोलनी करत आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजची जिओ आणि भारती एअरटेल एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.

मुंबई : मुकेश अंबानी यांची टेलीकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म एक मोठा आणि अंतिम करार करण्याच्या तयारीत आहे. या करारासाठी जिओकडे दोन पर्याय आहेत. एक पर्याय म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरा पर्याय म्हणजे गूगल. जिओची 6 टक्के भागीदारी विकत घेण्याची या दोघांचीही इच्छा आहे.

6 टक्के म्हणजे 30,000 कोटी -

आतापर्यंत जिओमध्ये ज्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्या व्हॅल्यूएशनचा विचार करता, जिओला 6 टक्के भागीदारीच्या बदल्यात जवळपास 30,000 कोटी रुपये मिळू शकतात. याच बरोबर गूगल जिओची स्पर्धक कंपनी व्होडाफोन-आयडियासोबतही 5 टक्के भागीदारी विकत घेण्यासंदर्भात बोलनी करत आहे. अशा स्थितीत गूगलचा करार जिओसोबत होईल याची शक्यता कमी आहे. 

बापरे! अखेर 'तो' खजिना सापडला, कोट्यवधींचं रहस्य 10 वर्षांनंतर उलगडलं...

7 आठवड्यात जिओचे 8 करार - 

मुकेश अंबानी यांच्या जिओने आतापर्यंत 97,885 कोटी रुपयांची गुंतवणूक केवळ 7 आठवड्यांत मिळवली आहे. एकूण 8 कंपन्यांनी 21.6 टक्के भागाच्या मोबदल्यात ही गुंतवणूक केली आहे. आता जिओमध्ये अंतिम कराराच्या स्वरुपात गूगल आणि मायक्रोसॉफ्ट गुतवणुकीसाठी तयार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गूगल अजूनही रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीसाठी संधी शोधत आहे. मात्र, गूगल आणि मायक्रोसॉफ्टचा विचार करता रिलायन्स जिओला एक गुंतवणूक नाकारावी लागेल. असे वृत्त आहे, की आता जिओमध्ये अंतिम भागीदारी विकली जात आहे. यामुळे कुण्याही एकाच कंपनीला संधी मिळू शकते.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

अमेझॉनची भारती एअरटेलसोबत चर्चा -
सध्या मार्केटमध्ये सर्वात चर्चेत असणाऱ्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अमेझॉन मैदानात उतरली आहे. अमेझॉन भारती एअरटेल या कंपनीत तब्बल २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये त्याबाबत चर्चा सुरु आहे. भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक वाढत आहे. अलीकडेच फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत जिओमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

जिओ आणि भारती एअरटेल एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी -

जर अमेझॉन आणि एअरटेल यांच्यात हा करार झाला तर एअरटेलमध्ये अमेझॉनची ५ टक्के भागीदारी असणार आहे. परंतु हे भारती एअरटेलच्या त्यावेळच्या किंमतीवर अवलंबून आहे. भारती एअरटेल ही देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलचे जवळपास ३० कोटी ग्राहक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजची जिओ आणि भारती एअरटेल एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात.

कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

 

Web Title: microsoft or google may have final deal with jio with buy 6 percent stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.